दिल्ली। भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरींदर बात्रा यांनी भारतीय फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई केली आहे.
१८ ऑगस्टपासून जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारताचा पुरूष आणि महिला फुटबॉल संघांचा समावेश नसणार आहे.
तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताचा यामध्ये प्रवेश निश्चित झाला होता. २०११च्या स्पर्धेत ते खेळले होते.
याबाबत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने (एआयएफएफ) पत्रकार परिषद घेतली होती.
“आयओएने संघांच्या प्रवेशाबद्दलचे सगळे निर्णय परस्परच घेतले. तसेच काही पुर्वसुचनाही त्यांनी आम्हांला दिली नाही. जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सहजच सांगितले की संघांना खेळण्यास परवानगी नाही,” यावेळी एआयएफएफचे मुख्य सचिव कुशल दास या परिषदेत बोलत होते.
“सध्या जगात २१२ देश फुटबॉल हा खेळ खेळत आहेत. तर मग आयओएचा हा किती मुर्खपणा की ज्यामुळे भारतीय फुटबॉलचे नुकसान होत आहे.”
“आशियाई स्पर्धेपेक्षा फिफा विश्वचषक स्पर्धा फार मोठी आहे. ज्यात रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात आशियातील ५ संघांचा समावेश आहे.”
आशियाच्या क्रमवारीत भारतीय पुरूषांचा संघ १४व्या स्थानावर आहे. तसेच त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या कामगिरीत प्रगती होत आहे.
१९९४च्या हिरोशिमा आशियाई स्पर्धेनंतर हे पहिल्यांदाच घडणार आहे.
एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही आयओए अध्यक्ष बात्रा आणि मुख्य सचिव राजीव मेहता यांच्याशी बोलणी केली होती. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही असे ते म्हणाले.
“आयओए जुन्याच म्हणजे पहिले ८ संघ आशियाई स्पर्धेत सहभाग घेणार या धोरणावरच ठाम आहे,” असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
–‘रिश्तो में हम तुम्हारे बाप लगते हैं’ म्हणणाऱ्या बच्चनलाही हा १९ वर्षीय खेळाडू वाटतो ‘बाप’
–क्रिकेटला मिळाला पहिला १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार खेळाडू