---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने केली पंचांची यादी जाहीर..! भारतीय पंच यादीतून गायब

---Advertisement---

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) येत्या (19 फेब्रुवारी) पासून सुरूवात होणार आहे. ही मेगा स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाणार आहे. यादरम्यान आयसीसीने पंचांची यादी जाहीर केली आहे. परंतु, आश्चर्याची बाब ही आहे की, जाहीर केलेल्या यादीमध्ये कोणत्याच भारतीय पंचाचे नाव नाही.

आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या पंचांच्या यादीत अनेक दिग्गज नावे समाविष्ट केलेली आहेत, ज्यांनी यापूर्वी देखील यांसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये पंचाची मुख्य भूमिका निभावली आहे. ज्यामध्ये कुमार धर्मसेना, रिचर्ड इलिंगवर्थ सारख्या नावांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 12 पंच अंपायरिंग करताना दिसतील. जे सर्व सामन्यांचे निर्णय देतील. याशिवाय 4 सामनाधिकरी यांची देखील घोषणा करण्यात आली आहे.

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चाहत्यांना एकही भारतीय पंच दिसणार नाही. कारण, आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत कोणत्याच भारतीय पंचाचे नाव नाही. सुरुवातीला अपेक्षा होती की, नितीन मेनन (Nitin Menon) किंवा अनिल चौधरी (Anil Chaudhary) पंचाच्या भूमिकेत असतील, परंतु चाहत्यांची ही अपेक्षा पूर्ण भंगली आहे.

आयसीसीने जाहीर केलेली पंच आणि सामनाधिकरी यांची यादी-

कुमार धर्मसेना, क्रिस गफ्फनी, मायकल गफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, अहसान रजा, पॉल रीफेल, शारफुद्दौला इब्ने शाहिद, रॉडनी टकर, एलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात (19 फेब्रुवारी) रोजी होईल. या मेगा स्पर्धेत 8 संघ खेळताना दिसतील. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान संघ न्यूझीलंडचा सामना करेल. त्यानंतर (20 फेब्रुवारी) रोजी भारतीय संघ बांगलादेशी सामना खेळून आपल्या मोहिमेचे सुरुवात करेल. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (23 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने असतील.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG; नागपूर वनडेसाठी संघाची घोषणा, 15 महिन्यानंतर या खेळाडूचे पुनरागमन

IND vs ENG: पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11, हा खेळाडू ‘एक्स’फॅक्टर

आयसीसी क्रमवारीत अभिषेक शर्माची गरुड झेप, भल्या-भल्यांना टाकले मागे..!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---