काल आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांचे तब्बल ३ सामने पहायला मिळाले. यात न्यूझीलॅंड विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राखत न्यूझीलॅंड कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेत शेवटचा कसोटी सामना जिंकत दक्षिण आफ्रिकानेही मालिका ३-१ अशी जिंकली तर पाकिस्तान विरुद्ध विंडीज टी२० मालिकेत दररोज १ याप्रमाणे ३ सामने पाकिस्तानच्या कराची शहरात झाले. काल या मालिकेतील तिसरा कसोटी सामना जिंकत पाकिस्तानने मालिका ३-० अशी जिंकली.
याबरोबर पुरुषांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता थेट ११ मे रोजी पाकिस्तानच्या आयर्लंड दौऱ्याने सुरू होणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तान एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.
इंडियन प्रिमीयर लीगचे बिगूल ७ एप्रिल रोजी वाजणार असून २७मे रोजी शेवटचा सामना होणार आहे. या काळात केवळ दोन कसोटी सामने होणार आहे. त्यात पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड (११ मे) तर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (२४ मे ) रोजी होणार आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायला बंदी असल्यामुळे याचा कोणताही परीणाम या स्पर्धेवर होणार नाही परंतु कसोटी मालिकेत निवड झालेले इंग्लंडचे खेळाडू मात्र अगदी शेवटच्या टप्प्यात मायदेशी परततील.
या काळात भारतीय महिला संघाचे सामने मात्र इंग्लंड महिला संघासोबत होत आहेत. ही ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ एप्रिल ते १२ एप्रिल या काळात नागपूर येथे होत आहे.