मुंबई । कोरोनाच्या महामारीच्या सावटात श्रीलंका क्रिकेट संघ लवकरच सराव शिबिराला सुरुवात करणार आहे. यासाठी निवड समितीने 24 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात श्रीलंका टी 20 कर्णधार लसिथ मलिंगा यांची निवड करण्यात आली नाही.
22 जूनपासून कँडी येथे सराव शिबिरास सुरुवात होणार आहे. लसित मलिंगा या सर्व शिबिराचा हिस्सा नसेल. प्रशिक्षक आणि स्टाफ यांच्या देखरेखीखाली संघ पल्लेकेले स्टेडियमवर सराव करणार आहे.
श्रीलंका संघाचा या महिन्यात होणारा भारताचा दौरा रद्द झाला आहे. त्यासोबतच पुढील महिन्यात बांगलादेश दौरा देखील रद्द होण्याची शक्यता आहे.
संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले, ” सराव शिबिरासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कोरोना वायरसच्या नंतर सुरू होणाऱ्या क्रिकेट मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ कधीही तयार राहावा. यासाठी हे सराव शिबीर घेण्यात येत आहे. यासोबतच संघातील खेळाडूंच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.”
सराव शिबिरासाठी निवडण्यात आलेला संघ
दिमुथ करूणारत्ने, दिनेश चांदीमल, लाहिरू तिरिमन्ने, एंजेलो मॅथ्यूज, तिसारा परेरा, धनुष्का गुणतिलका, कुसल जेनिथ परेरा, दिलरूवान परेरा, सुरंगा लकमल, धनंजय डिसिल्वा, निरोशन डिकवेला, दासुन शनाका, विश्वा फर्नांडो, कासुन रंजीता, लाहिरू कुमारा, नुवान प्रदीप, इसुरू उदाना, वानिंडु हसारनागा, लक्षाण संदाकन, लसिथ ई, ओशाडा फर्नांडो, अविष्का फर्नाडो, कुसल मेंडिस आणि भानुका राजपक्षा