2019 हे वर्ष संपत आहे. त्यातच आता माजी क्रिकेटपटू, क्रिकेट मंडळ (बोर्ड) आणि मोठ- मोठ्या क्रिकेट मासिकांनी या वर्षातील तसेच दशकातील सर्वोत्कृष्ट संघ निवडायला सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) संपुर्ण दशकातील सर्वोत्तम कसोटी आणि वनडे संघ घोषित केले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) या दोन भारतीय खेळाडूंना कर्णधारपद दिले आहे.
त्याचबरोबर आता, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरने आपल्या या वर्षाच्या सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. गंभीरने वनडे किंवा कसोटी क्रिकेटच्या ऐवजी थेट ‘जागतिक अकरा’ खेळाडूंच्या (World XI) संघाची घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या संघांमध्ये गंभीरने धोनीला जागा दिली नाही.
गंभीरने ट्विटर अकाऊंटवरून आपल्या ‘जागतिक अकरा’ संघाची घोषणा केली आहे. या संघात त्याने दोन अशा नावांचा समावेश केला आहे. ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
As #2019 comes to an end, we have witnessed some great cricketing talent. Here's my pick for World XI.
Rohit Sharma
Tom Latham
S. Smith
Virat Kohli
K.Williamson (c)
Arvind Vashishth
Ben Stokes
Cummins
Bumrah
N. Lyon
Vayu Raghavan#YearRoundUp #Wrapped2019 #PPL19 #InsideEdge2— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 24, 2019
गंभीरने आपल्या संघात अशा 2 नावांना जागा दिली आहे. जे मुळात अस्तित्वात नसून काल्पनिक आहेत. यामध्ये ‘इनसाइड एज’ (Inside Edge) या वेब सीरिजमधील प्रमुख पात्र, अरविंद वशिष्ठ (Arvind Vashishth) आणि वायू राघवन (Vayu Raghavan) हे काल्पनिक खेळाडू आहेत.
या संघात गंभीरने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि न्यूझीलंडच्या टाॅम लॅथमला (Tom Latham) सलामीवीर फलंदाज म्हणून निवडले आहे. त्याचबरोबर, त्याने स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांना अनुक्रमे क्रमांक 3 आणि 4 साठी निवडले आहे.
तसेच, न्यूझीलंजचा कर्णधार केन विलियम्सनला (Kane Williamson) आपल्या संघाचा कर्णधार नेमले आहे. विलियम्सन या संघात 5व्या क्रमांकावर असणार आहे.
गंभीरच्या या अकरा खेळाडूंमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून बेन स्टोक्सला (Ben Stokes) स्थान देण्यात आले आहे. तर, गोलंदाजीमध्ये पॅट कमिंसचा (Pat Cummins) समावेश आहे. कमिंसचा सहकारी म्हणून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) असणार आहे. तसेच, फिरकीपटू म्हणून नॅथन लायनने (Nathon Lyon) स्थान मिळवले आहे.
२०१९ या वर्षातील फक्त 'ती' गोष्ट बदण्याची विराट कोहलीला इच्छा
वाचा- ????https://t.co/eUChoX7GYU????#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019
माझ्यासाठी ही नवी सुरुवात असली तरी फलंदाजी करणे विसरलेलो नाही-शिखर धवन
वाचा- ????https://t.co/WVdxdjQxpl????#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019