आशिया चषक स्पर्धेसाठी अखेर अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली. 17 सदस्यीय संघात अनेक प्रमुख खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. मात्र, संघाचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक हा संघात जागा बनवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आशिया चषकात विराट कोहली विरुद्ध नवीन असे द्वंद्व पाहता येणार नाही यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला.
आशिया चषकासाठी निवडलेल्या अफगाणिस्तान संघात वेगवान गोलंदाज म्हणून फजलहक फारुकी, गुलबदीन नईब, अब्दुल रहमान व सलीम यांना संधी मिळाली आहे. युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याला मात्र संघात जागा मिळाली नाही. अफगाणिस्तान संघ निवड होण्याआधी अनेक चाहत्यांनी आशिया चषकात विराट कोहली व नवीन यांच्यातील लढाई पाहण्यास उत्सुक असल्याचे म्हटलेले. मात्र, त्यांचा आता अपेक्षाभंग झाल्याचे दिसते.
आयपीएल 2024 मध्ये आरसीबी विरुद्ध लखनऊ या सामन्यात विराट व नवीन यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर संपूर्ण हंगामात याची जोरदार चर्चा रंगलेली. नवीन याने अनेकदा विराटला डिवचत सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या. त्यावर विराटच्या चाहत्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलेले. मात्र, विराटने यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
नवीन हा केवळ अफगाणिस्तानसाठी टी20 क्रिकेट खेळत असतो. त्यामुळे आशिया कप आणि त्यानंतर विश्वचषकात देखील तो खेळण्याची शक्यता कमी आहे.
आशिया चषकासाठी अफगाणिस्तान संघ:
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झादरान, रियाझ हसन, रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, नजीब झादरान, रशिद खान, इक्रम अली खिल, करीम जनत, गुलबदीन नईब, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, मोहम्मद अशरफ, नूर अहमद, अब्दुल रहमान आणि सफी सलीम.
(No Naveen Ul Haq In Afghanistan Sqaud Fans Miss Virat Naveen Clash)
महत्वाच्या बातम्या –
कॅलिसचा क्लास 47 व्या वर्षीही कायम! 22 चेंडूवर ठोकले वादळी अर्धशतक, पाहा व्हिडिओ
अहमदाबादमध्ये होणार वर्ल्डकपचा उद्घाटन सोहळा, जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी