---Advertisement---

पृथ्वीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच करणार कमबॅक, वाचा सविस्तर

On: बुधवार, ऑगस्ट 23, 2023 5:24 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉला आगामी देशांतर्गत काही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता काहीशी कमी आहे. इंग्लंडच्या देशांतर्गत वनडे स्पर्धेत नॉर्थम्प्टनशायर संघाकडून खेळताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता जिथे तो रॉयल लंडन वन डे चषक स्पर्धेतून बाहेर झाला. मात्र, सुरुवातीला त्याच्या दुखापतीची जितकी गंभीरता वाटत होती तितकी नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

रॉयल लंडन कपमध्ये धमाकेदार फॉर्म मध्ये असताना त्याला गुडघ्याची दुखापत झाली. यातून बरा होण्यासाठी त्याला बराच काळ लागणार असल्याचे सांगितले जात होते. तसेच त्याच्यावर अवघड शस्त्रक्रिया देखील करण्यात येईल असे वैद्यकीय पथकाने प्राथमिक अहवालात म्हटलेले. मात्र, नव्या अहवालानुसार, पृथ्वीवर शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही असे सांगण्यात आले आहे. त्याची दुखापत ही 2 पीसीएल या प्रकारातील असून, यामध्ये केवळ काळजी घेतली तरी, त्याची दुखापत बरी होऊ शकते. त्यामुळे तो रणजी ट्रॉफीच्या हंगामासाठी उपलब्ध होऊ शकतो. वनडे विश्वचषकानंतर रणजी ट्रॉफी हंगाम खेळला जायला.

रॉयल लंडन वनडे चषकात नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळताना पृथ्वी उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. शॉने एका सामन्यात 153 चेंडूत 244 धावांची शानदार खेळी केली. तर एका सामन्यात त्याने 76 चेंडूत 125 धावांची नाबाद झंझावती खेळी केलेली. पृथ्वी मागील जवळपास दोन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात त्याला अपयश आले होते. यावर्षी आयपीएलमध्ये देखील तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धावांचा रतीब घातला होता. मात्र, त्यानंतरही त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आले नाही.

(No Need Of Surgery For Prithvi Shaw Its PCL 2 Injury)

हेही वाचा-
आयर्लंड दौरा गाजवत असलेल्या बुमराह-प्रसिद्धविषयी भारतीय प्रशिक्षकाचे विधान; म्हणाला, ‘विश्वचषकापूर्वी…’
शंभर चेंडूंच्या लीगमध्ये फलंदाज बनला रिंकू सिंग; 5 चेंडूत ठोकले 5 जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---