वनडे विश्वचषक 2023मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक लढत शनिवारी (14 ऑक्टोबर) चाहत्यांना पाहायला मिळाली. कर्णधार रोहित शर्मा याच्या वादळी खेळीमुळे भारताने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. विश्वचषक 2023 मधील भारताला मिळालेला हा सलग तिसरा विजय असून कर्णधार रोहित शर्माने खास प्रतिक्रिया दिली.
वनडे विश्वचषकाला 5 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. अगदी पहिल्या सामन्यापासून भारतीय संघा उत्साहात असून जोरदार खेळी करत आहे. कर्णधार रोहित शर्मा याने आगामी सामन्यांमध्ये खेळाडू अशाच पद्धतीने खेळत राहतील, अशी आशा व्यक्त केली आहे. सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “सगळेच जण उत्कृष्ट खेळत आहेत. मी फिंगर क्रॉस ठेवतो हे असंच चालू राहो. जास्त उत्साहित होण्याची गरज नाही. तसेच जास्त डळमळीत होऊनही चालणार नाही. सर्व संतुलित असावं.”
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तान संघ अवघ्या 191 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने हा सामना 30.3 षटकात आणि 3 विकेट्सच्या नुकसानावर जिंकला. रोहित शर्मा याने 63 चेंडूत 86 धावा कुटल्या, तर श्रेयस अय्यर याने 62 चेंडूत 53 धावांची खेळी केली. 7 षटकात 19 धावा खर्च करून दोन विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कार दिला गेला. पाकिस्तानसाठी बाबर आझम एकमेव खेळाडू ठरला, ज्याने अर्धशतक केले. (No need to get too excited, says Rohit After defeating Pakistan)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाकडून पाकिस्तानची धूळधाण! विजयी हॅट्रिकसह परंपरा राखली कायम
अवघ्या काही धावांनी हुकलं रोहितचं आठवं विश्वचषक शतक! पाहा शाहीनने कशी घेतली विकेट