---Advertisement---

‘प्रत्येक वेळी आक्रमकतेचे प्रदर्शन करणे गरजेचे नाही’, गावसकरांचा विराटला अप्रत्यक्ष टोला

---Advertisement---

क्रिकेट हा खेळ जितका रोमहर्षक आहे, तितकाच आक्रमकतेने भरलेला देखील आहे. शतक केल्यानंतर वा बळी घेतल्यानंतर आपआपल्या पध्दतीने खेळाडू आनंदोत्सव साजरा करत असतो. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचे मत आहे की प्रत्येक विकेट घेतल्यानंतर ओरडल्याशिवाय आनंदोत्सव साजरा करता येऊ शकतो. भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानावर आक्रमक राहतो, पण या संदर्भात माजी कर्णधार गावसकर विराटच्या पद्धतीशी सहमत नाही. चेहऱ्यावर जास्त आक्रमकता दाखवण्याची गरज नाही असे गावसकर म्हणतात.

इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी आपल्या स्तंभात लिहिले, “कोहली योग्य वेळी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. त्यांच्या खेळाडूंना, विशेषत: गोलंदाजांना आक्रमक कर्णधार हवा असतो. हा पूर्वीचा भारतीय संघ नाही, ज्यास डिवचता येईल. ”

तिसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने विराटच्या कर्णधारपदाची आणि भारतीय संघाची खूप प्रशंसा केली होती. त्यांनी असे म्हटले होते की, ‘हा भारतीय संघ धमकी सहन करणार संघ राहिलेला नाही. पूर्वीच्या पिढ्या हे सहन करत होत्या.’

भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर त्यांच्या वक्तव्यावर जास्त खूश झाले नाहीत आणि त्यांनी उत्तर दिले, ‘विराट कोहलीच्या आधीची भारतीय पिढी ‘भित्री’ नव्हती. पण उत्कटतेने खेळायची. आक्रमकता तुमच्या चेहऱ्यावर असणे आवश्यक नाही. भारताने 1971 मध्ये 1-0 आणि 1986 मध्ये 2-0 च्या फरकाने इंग्लंडला इंग्लंडमध्ये नमवले होते. तेही अगदी चांगल्या इंग्लिश संघाविरुद्ध विजय मिळवला होता, हे कधीही विसरू नका.’

गावसकर पुढे म्हणाले, “मला असे वाटत नाही की आक्रमकता म्हटली म्हणजे तुम्हाला नेहमी समोरच्याच्या विरोधाला सामोरे जावे लागते. तुम्ही उत्साह दाखवू शकता, तुम्ही तुमच्या संघाशी बांधिलकी दाखवू शकता.”

कोहली मैदानावर कसा वागला याच्याशी त्यांचा स्पष्ट संदर्भ होता. मात्र कोहली संघात ऊर्जा आणतो यावर गावसकर मात्र सहमत होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

संधी मिळत नसल्याने अश्विनने सुरू केली डाव्या हाताने फलंदाजी, ट्विटर पोस्ट करताना लिहिले…

भारताविरुद्ध ३५४ धावांची आघाडी; यापूर्वी ४ वेळा इंग्लंडने घेतलीये मोठी लीड, पाहा काय लागलेत निकाल

तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर फाफ डू प्लेसिस उतरणार पुन्हा मैदानात; ‘या’ संघाचे करणार नेतृत्व

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---