नॉटिंगहॅम। आज(13 जून) विश्वचषक 2019 स्पर्धेत 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडणार होता. पण ट्रेंट ब्रिज मैदानावर होणारा हा सामना नाणेफेकही न होता पावसामुळे रद्द झाला आहे.
या विश्वचषकात रद्द होणारा हा एकूण चौथा सामना आहे. तर नाणेफकही न होता रद्द होणारा या विश्वचषकातील तिसरा सामना आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की एका विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा अधिक सामने एकही चेंडू न खेळता पावसामुळे रद्द झाले आहेत.
आजच्या सामन्याआधी 2019 विश्वचषकात 7 जूनला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील सामना आणि 11 जूनला बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघातील सामना पावसामुळे नाणेफकही न होता रद्द झाला आहे.
तसेच याआधीच्या 11 विश्वचषक स्पर्धांमध्ये फक्त 1979 च्या विश्वचषकात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील सामना तर 2015 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश संघातील सामना पावसामुळे एकही चेंडूचा खेळ न होता रद्द झाला होता.
त्याचबरोबर 2019 विश्वचषकात 10 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामनाही पावसामुळेच अनिर्णित राहिला होता. पण या सामन्यात केवळ 7.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामना पुर्ण होऊ शकला नव्हता.
विश्वचषकात एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द होणारे सामने –
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज – 1979, द ओव्हल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – 2015, ब्रिस्बेन
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – 2019, ब्रिस्टॉल
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – 2019, ब्रिस्टॉल
भारत विरुद्ध न्यूझीलंज – 2019, नॉटिंहहॅम
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताचे प्रशिक्षक म्हणतात, केएल राहुलने बनावे टीम इंडियाच्या या दिग्गज क्रिकेटर सारखे…
–ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानच्या कर्णधाराला केले अफलातून रनआऊट, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: या दोन संघात होणार अंतिम सामना, गुगल सीईओ सुंदर पिचाईनी व्यक्त केला अंदाज