ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने ऑस्ट्रेलिया संघाविषयी मोठे आणि वादग्रस्त असे विधान केले आहे. यावेळी तो म्हणाला की, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या करारात चांगले नाव कमावल्यामुळे त्याच्याविरुद्ध खेळण्याची आणि त्याला अपशब्द वापरण्याची ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भीती वाटते.
क्लार्कने (Michael Clarke) बिग स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात सांगितले की, आयपीएलसह (IPL) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावरील क्रिकेटमध्येही भारत आर्थिकदृष्टीने सामर्थ्यवान आहे. आयपीएलमध्ये तर खेळाडूंना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो.
“मला असे वाटते की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच नव्हे तर जगभरातील इतर संघाचीही भारतीय संघाबद्दलची वागणूक चांगली झाली आहे. कोणतेही खेळाडू विराट (Virat Kohli) किंवा भारतीय संघाविरुद्ध अपशब्द वापरण्यास घाबरत आहेत. कारण त्यांना लगेच पुढे एप्रिल महिन्यात भारतीय खेळाडूंबरोबर आयपीएल खेळायचे असते,” असेही पुढे बोलताना क्लार्क म्हणाला.
खेळाडूंनी विराटबद्दल अपशब्द वापरण्यास नकार दिला होता. कारण, त्यांना कदाचित विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात समाविष्ट होऊन 10 कोटी मिळवण्याची अपेक्षा असावी. एवढेच नव्हे तर, एकवेळ ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू हे भारताविरुद्ध इतके मजबूत नव्हते जितके ते नेहमी असतात, असेही क्लार्कने कार्यक्रमात सांगितले.
२०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-१च्या फरकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. यावेळी स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश नव्हता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं
-सचिनला आऊट झाला की हा खेळाडू करायचा रडायला सुरुवात
-आणि युवराजने बसमधील सिटवर बसलेल्या रोहितला उठवले