न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेल (Ajaz Patel) भारताविरुद्धच्या मुंबई कसोटीत एका डावात १० बळी घेत इतिहास रचला होता. (Ajaz Patel 10 Wickets) मात्र, आता त्याला न्यूझीलंडच्या कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर करण्यात आला असून, त्यात एजाजला स्थान मिळाले नाही. (No Ajaz Patel In Newzealand Test Team)
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड (Gary Stead) यांनी एजाजला बाहेर करण्याचे कारण सांगितले. स्टीड म्हणाले की, “एजाज पटेलने भारताविरुद्ध ऐतिहासिक गोलंदाजी केली होती. मात्र, निवड करताना काही वेगळ्या निकषांचा आधार घेतला जातो. एजाज मायदेशातील कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघात बसत नाही. ज्या त्या जागेवर तशा पद्धतीचा खेळाडू निवडण्याची प्रक्रिया आम्ही अवलंबली आहे.”
न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानांवर बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना ९ जानेवारीपासून होणार असून, या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. (Bangladesh Tour Of Newzealand)
न्यूझीलंड संघात भारताविरुद्ध खेळलेल्या जवळपास सर्वच खेळाडूंना स्थान मिळाले आहे. केवळ एजाज पटेल संघाबाहेर आहे. डेव्हॉन कॉनवे आणि मॅट हेन्री संघात परतले आहेत. दुखापतग्रस्त कर्णधार केन विलियम्सनला विश्रांती देण्यात आली आहे. एजाज याने भारताविरुद्ध मुंबई येथे झालेल्या कसोटीत इतिहास रचला होता. त्याने या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचे सर्वच्या सर्व दहा गडी बाद केले होते. इंग्लंड जिम लेकर व भारताच्या अनिल कुंबळे यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा गोलंदाज आहे. तसेच त्याने या कसोटीच्या दुसऱ्या डावातही चार भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड कसोटी संघ: टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, कायले जेमिसन डॅरेल मिशेल, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कितने आदमी थे’ डायलॉगवर शिखर धवनची कडक ऍक्टिंग, सिनेमातील ‘गब्बर’लाही देईल टक्कर!
भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर