भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची (sachin tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (sara tebdulkar) नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. सारा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. चाहत्यांसाठी सोशल मीडिया खात्यांवरून ती नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता साराने चाहत्यांसाठी अजून एक सुंदर पोस्ट केली आहे.
साराने ही पोस्ट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून केली आहे. तिने शेअर केलेल्या या नवीन पोस्टमधून ती गोव्याला फिरायला गेल्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. या पोस्टमध्ये तिने गोव्याचे लोकेशन टाकले आहे आणि कॅप्शनमध्ये देखील गोव्याचा उल्लेख केला आहे. सारा या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “हॅलो गोवा,” असे लिहिले आहे.
सारा तेंडुलकर जेव्हा-जेव्हा इंस्टाग्रामवर नवीन पोस्ट शेअर करते, तेव्हा चाहते या पोस्टला प्रचंड लाईक्स देतात आणि पोस्ट व्हायरल होत असते. या पोस्टबाबतीतही तसेच पाहायला मिळत आहे. चाहत्यांना साराचा या पोस्टमधील लूक खूपच भावल्याचे दिसत आहे.
हेही वाचा- सारा तेंडुलकरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा वनराज झवेरी आहे तरी कोण? घ्या जाणून
या पोस्टमध्ये सारा एका निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि तिच्या हातात गुलाबाची फुलं दिसत आहेत. यावेळी सारा एका खुर्चीवर बसलेली आहे आणि तिने डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा देखील घातलेला आहे. फोटोत असे दिसत आहे की, जो व्यक्ती फोटो काढत आहे त्याच्या दिशेने साराने हात पुढे केला आहे. कदाचीत तिने कॅमेरा पकडण्यासाठी हात पुढे केलेला असू शकतो. फोटोत साराच्या चेहऱ्यावर एक सुंदरसे हास्य दिसत आहे. तिच्या या नवीन फोटोला चाहत्यांनी असंख्य लाईक्स दिल्या आहेत.
गाईका आणि संगित निर्माती कनिका कपूर आणि सारा, या दोघी चांगल्या मैत्रिणी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या दोघींना देश विदेशात अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. साराच्या या नवीन पोस्टवर कनिकाने देखील कमेंट केली आहे. कमेंटमध्ये कनिकाने लिहिले की, “माय गर्ल (myyyyyy girl).”
सारा तेंडुलकर आणि भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्या संबंधांविषयी सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होत असते. या पोस्टमध्ये देखील चाहत्यांनी हा विषय छेडलाच. चाहत्यांनी कमेंट्समध्ये शुभमन गिल कुठे आहे? अशा प्रश्न विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’
‘कितने आदमी थे’ डायलॉगवर शिखर धवनची कडक ऍक्टिंग, सिनेमातील ‘गब्बर’लाही देईल टक्कर!
Video: लाईव्ह सामन्यातील ‘ब्रोमान्स’ची इंटरनेटवर तुफान चर्चा, कर्णधाराचे मैदानातच गोलंदाजाला किस
व्हिडिओ पाहा –