---Advertisement---

क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’

Ravichandran-Ashwin
---Advertisement---

भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम  गोलंदाजांपैकी एक आहे, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin). मर्यादित षटकांपेक्षा कसोटी क्रिकेटमधील अश्विनचे प्रदर्शन पाहिले, तर ते जबरदस्त राहिले आहे. अश्विन २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सामील होता, पण त्याला या दौऱ्यातील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांतून दुखापतीच्या कारणास्तव बाहेर केले गेले होते.

त्यानंतर पुढचे ८-१० महिने तो संघातून बाहेर राहीला आणि २०१९-२० मध्ये दक्षिण अफ्रिकाविरुद्ध मालिकांमधून संघात पुनरागमन केले. दरम्यानच्या काळात अश्विनला अनेक मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. या काळात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (ms dhoni) याने दिलेल्या सल्ल्याचा त्याला फायदा झाला होता.

२०१७ नंतर अश्विन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघातून बाहेर होता, पण कसोटी क्रिकेट खेळत होता. परंतु कसोटी क्रिकेटमध्येही त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. यादरम्यान त्याला काही काळासाठी कसोटी संघाच्या बाहेर देखील राहावे लागले होते. ज्यावेळी अश्विन कसोटी संघातून बाहेर होता; त्या काळात त्याला खूप मानसिक त्रास झाला होता, हा खुलासा त्याने स्वतः केला आहे.

तो म्हणाला, “मला वाटते की आत्म-जागरूक असणे खूप गरजेचे आहे आणि मी खूप विचार कतो. त्यामुळे माझ्यासाठी हे जास्त कठीण होते. जर तुम्हाला दुखापत झाली, तर तुम्ही पुनरागमन करत असता आणि ही गोष्ट तुमच्या डोक्यात चालू असते. जर तुम्हाला दुखापत झाली आहे आणि तुम्हाला तशा मानसिक यातनेतून जावे लागले, ज्यामधून मी गेलो होतो; तर ही गोष्ट अधिक कठीण होऊन बसते. मला वाटते की, अनुभव खूप कामी येऊ शकतो. मी माझ्या आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहे आणि यासाठी मी खूप आभारी आहे.”

“ही माझ्यासाठी मानसिक बाब जास्त झाली होती. मी माझ्या आयुष्यातील अपयशांना कधीच घाबरलो नाही. जसे महेंद्रसिंग धोनी नेहमी म्हणातात, ही प्रक्रियेची गोष्ट आहे. मला वाटते की निश्चितच प्रक्रियेला सोबत घेतले आहे आणि मी लाखो-करोडो लोकांसमोर अपयशी व्हायला घाबरत नाही. याने काही फरक नाही पडत की. कमीत कमी माझ्याकडे संधी तर आहे. मी यशस्वी होईल किंवा अयशस्वी. खरं तर जास्त लोकं या गोष्टीला समजून घेत नाहीत,” असे अश्विन म्हणाला.

महत्वाच्या बातम्या –

गौतम गंभीरनंतर लखनऊ संघाचा भाग बनला ‘हा’ भारतीय दिग्गज, सहाय्यक प्रशिक्षकपदी झालीय नियुक्ती

प्रो कबड्डी २०२१ : ‘बंगाल वाॅरियर्स’चा ‘युपी योद्धा’ संघाला दणका, ३८-३३च्या फरकाने सामना घातला खिशात

पार्टी टाईम! प्रशिक्षक द्रविडसंगे भारतीय खेळाडूंनी घेतला ‘बीबीक्यू नाईट’चा आनंद, पाहून तोंडाला सुटेल पाणी

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील ते २ ऐतिहासिक क्षण 'याचि देह याचि डोळा' पाहणाऱ्या अवलियाची गोष्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---