झिम्बाब्वे आणि भारत संघातील हरारे येथे झालेला तिसरा व अखेरचा वनडे सामना शुबमन गिल याने गाजवला. २२ वर्षीय गिलने या सामन्यात शानदार शतक केले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १३ धावांनी हा सामना जिंकला. त्याच्या या शानदार खेळीबद्दल त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आले. त्याच्या या खेळासाठी अनेक जण कौतुक करत आहेत. आता न्यूझीलंडचा महान अष्टपैलू व समालोचक स्कॉट स्टायरिश याने त्याच्या टी२० संघातील जागेविषयी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
स्टायरिश सातत्याने भारतीय क्रिकेट संघाबद्दल प्रतिक्रिया देत असतो. गिलच्या शानदार कामगिरीनंतर त्याचे स्टायरिशने कौतुक केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्याला गिलच्या टी२० संघातील समावेशाबाबत देखील विचारले गेले. यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“मला नाही वाटत त आता तरी त्या संघात दिसेल. वर्षभरात तो आणखीच शिकून भारताच्या तिन्ही संघात असू शकतो. टी२० संघात येण्याकरता त्याच्या खेळात काही सुधारणा होणे गरजेचे आहे.”
स्टायरिशने ही गोष्ट देखील निदर्शनास आणून दिली की, गिल आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये काहीसा अडखळताना दिसला होता.
गिलने या सामन्यात ९७ चेंडूवर १५ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १३० धावा केल्या. संपूर्ण मालिकेचा विचार केल्यास त्याने या तीन सामन्यात मिळून एक शतक व एक अर्धशतकाच्या मदतीने २४५ धावा केल्या. गिल भारताकडून आतापर्यंत कसोटी आणि वनडे सामने खेळला आहे. मात्र, त्याला टी२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. मागील दोन वनडे मालिकेत त्याने सहा डावात ४५० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर इथं शतक हाणून बसलाय अन् विराटला साधा सिक्स मारायला जमंना!
‘त्याला कोरोना झालाच नाही, हे तर फक्त…’; शास्त्री गुरूजींचे अजब विधान
नशिब फुटकं ते फुटकंच! प्लेइंग ११ मध्ये संधी न मिळाल्याने माजी दिग्गजाने बीसीसीआयला झापलं