भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल हा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. नव्या वर्षात त्याच्या बॅटने अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसून येतो. यासोबतच तो त्याच्या मैदानाबाहेरील आयुष्याबाबत देखील अनेकदा चर्चेत असलेला दिसून येतो. तो भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तसेच अभिनेत्री सारा अली खान यांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. मात्र, याबाबत कोणीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचवेळी साउथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही शुबमनची क्रश असल्याची बातमी प्रसिद्ध झालेली. आता त्यावर स्वतः शुबमनने समोर येत स्पष्टीकरण दिले आहे.
मनोरंजन विश्वातील बातम्या देणाऱ्या एका संकेतस्थळाने नुकताच दावा केला होता की, शुबमन याची क्रश रश्मिका मंदाना आहे. त्यावर सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली होती. मात्र, शुबमनने हा दावा फेटाळून लावला. त्याने त्याच पोस्टवर कमेंट करताना लिहिले,
‘हे मी कधी बोललो आहे? मला स्वतःलाच याबाबत माहिती नाही.’
गिल याचे नाव सारा तेंडुलकरशी मागील अनेक वर्षांपासून जोडले जात आहे. ती त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर सातत्याने कमेंट करत असते. त्या दोघांना एकत्र पाहिल्याचे देखील अनेक जण सांगतात. नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डेला ते एकाच कॉफी शॉपमध्ये असल्याचे दिसून आलेले. मात्र, याबाबत अद्याप उघडपणे कोणीही प्रतिक्रिया दिलेली दुसरीकडे, अभिनेत्री सारा अली खान हिला देखील त्याच्यासोबत अनेकदा पाहिले जाते. काही दिवसांपूर्वीच दोघांना एका कॉफी शॉपमध्ये एकत्रित पाहण्यात आलेले. तसेच तिने अनेकदा क्रिकेट सामन्यांना देखील उपस्थिती दर्शवली आहे.
(No Sara Tendulkar No Sara Ali Khan Rashmika Mandana Is Crush Of Shubman Gill Entertainment Site Report)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत