---Advertisement---

सूर्या नाही, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर ‘हा’ फलंदाज बेस्ट; अनुभवी फिरकीपटूने सांगितले नाव

Cricketer-Suryakumar-Yadav
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताला इंग्लंड विरुद्ध आणि न्यूझीलंडला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून चांगली सुरूवात करण्याचा दोन्ही संघाचा निर्धार असणार आहे. या दौऱ्याची सुरूवात टी20 मालिकेने झाली असून वेलिंग्टन येथे खेळला जाणारा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. या दौऱ्यातून विराट कोहली याला वगळले असून त्याची जागा कोण घेणार हे अनुभवी फिरकीपटूने सांगितले आहे.

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल, मोहम्मद शमी, विराट कोहली (Virat Kohli) आणि आर अश्विन या खेळाडूंना आणि नियमित कोचिंग स्टाफलाही विश्रांती दिली आहे. त्यामुळे संघ टी20 मालिकेत मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. यावेळी संघात श्रेयस अय्यर, संजू सॅमसन यांना जागा मिळाली आहे. तसेच या मालिकेसाठी भारताच्या टी20 विश्वचषक खेळलेले संघात सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, रिषभ पंत आणि युझवेंद्र चहल यांना घेतले आहे.

अनेकदा दिसले आहे की संघात जर विराट नसला तर सूर्यकुमार त्याच्या जागेवर फलंदाजी करतो, मात्र न्यूझीलंडच्या दौऱ्यात तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर याने फलंदाजी करावी, असे आर अश्विन याने म्हटले आहे. तसेच त्याने सूर्यकुमारने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असेही त्याने सुचविले आहे.

अश्विन म्हणाला, “जर रिषभ पंतला सलामीला फलंदाजी करण्यास सांगितले तर पाचव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर याने यावे. मधल्या फळीत सुंदर याच्याशिवाय कोणताच डाव्या हाताचा फलंदाज नाही. टी20मध्ये डाव्या-उजव्या हाताने फलंदाजी कॉम्बिनेशन उत्तम ठरते. तसेच सुंदरने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी नाही केली तर मग तो संघात कोणत्या जागी योग्य हे मला माहित नाही.”

भारताच्या टी20 संघात प्रथमच शुबमन गिल यालाही निवडले आहे. No Suryakumar Yadav, Shreyas Iyer is the best batsman at number 3 against New Zealand, R Ashwin suggests

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधारपदाबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय; रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाचा तर, हार्दिक पंड्या टी20चा कॅप्टन!
कर्मच! बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केल्यानंतर विराटच्या चाहत्यांचा टिवटिवाट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---