आयसीसीकडून दरवर्षी सर्वोत्कृष्ट क्रिकेटर हा पुरस्कार दिला जातो आणि जो खेळाडू विजेता घोषित केला जातो त्याला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी दिली जाते. यावेळी देखील 2023 मधील त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आयसीसीने चार खेळाडूंना नामांकन दिले आहे, ज्यात भारताकडून विराट कोहली आणि रवींद्र जडेजा, तर ऑस्ट्रेलियाचे ट्रॅव्हिस हेड आणि पॅट कमिन्स यांची निवड करण्यात आली आहे.
विराट कोहली
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याचा फलंदाजीतील खराब टप्पा 2022 च्या शेवटी संपला आणि 2023 मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. विराटने 35 सामन्यांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये 66.06 च्या सरासरीने 2048 धावा केल्या. या कालावधीत वनडे फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून 1377 धावा निघाल्या. गेल्या वर्षी त्याने वनडे फॉरमॅटमध्ये खूप धावा केल्या आणि विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. या स्पर्धेदरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रमही केला. (nominees for sir garfield sobers trophy and rachael heyhoe flint trophy 2023 revealed)
रवींद्र जडेजा
भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) याची 2023 मध्ये जबरदस्त कामगिरी होती. या डावखुऱ्या खेळाडूने गोलंदाजीत 66 विकेट्स घेतल्या आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये 35 सामन्यांमध्ये फलंदाजीमध्ये 613 धावा केल्या. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याने 22 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वनडे फॉरमॅटमध्ये जड्डूने 31 विके्टस घेतल्या आणि 309 धावा केल्या. मात्र, तो टी20 मध्ये फक्त दोनच सामने खेळला, ज्यामध्ये त्याच्या नावावर 2 विकेट्स आणि 23 धावा होत्या.
ट्रॅव्हिस हेड
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या प्रत्येक मोठ्या मालिकेत किंवा स्पर्धेत ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जबरदस्त शतक झळकावून आपल्या संघाच्या विजेतेपदात मोठी भूमिका बजावली, तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने दुखापतीमुळे अर्धी स्पर्धा गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले. हेडने एकट्याने ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत विजय मिळवून दिला आणि तो सामनावीर ठरला. त्याने 2023 मध्ये 31 सामन्यांमध्ये तिन्ही फॉरमॅट मिळून 1698 धावा केल्या.
पॅट कमिन्स
2023 मध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने मोठी कामगिरी केली, ज्यामध्ये स्वतः कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याचेही महत्त्वाचे योगदान होते. त्याने 24 सामन्यात 59 विकेट्स घेतल्या आणि 422 धावा केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसीचे विजेतेपद पटकावले, आणि विश्वचषक 2023 विजेतेपदही जिंकले. (Cricketer of the Year ICC announces 2023 ‘Cricketer of the Year’ list includes names of these two Indian players)
हेही वाचा
INDW vs AUSW । डी वाय पाटीलवर स्मृती-शेफालीचा धमाका, पहिल्या टी-20 ऑस्ट्रेलियालाविरुद्ध तितास साधू ठरली मॅचविनर
AUS vs PAK । ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आमीरकडून वसीम अक्रमची बरोबरी, सिडनी कसोटी ठरली ऐतिहासिक