---Advertisement---

BREAKING! ‘या’ तारखेला भिडणार भारत-पाकिस्तान, टी20 वर्ल्डकपचे वेळापत्रक घोषित

On: शुक्रवार, जानेवारी 5, 2024 7:29 PM
babar Azam Virat Kohli
---Advertisement---

आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साठी सर्व संघ तयारीत आहेत. शुक्रवारी (5 जानेवारी) विश्वचषकाच्या लाखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले गेले. एकूण 20 संघ आगामी टी-20 विश्वचषकात भाग घेणार आहेत. विश्वचषकासाठी ग्रीप स्टेजमध्ये 20 संघांची विभागणी प्रत्येकी पाच-पाच संघांच्या ग्रुपमध्ये केली गेली आहे. स्पर्धेचे यजमानपद आधी ठरल्याप्रमाणे वेस्ट इंडीज आणि अमेरिकेकडे असेल.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ची सुरुवात 1 जून रोजी होणार आहे. पहिलाच सामना यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात खेळला जाणार आ हे. 26 आणि 27 जून रोजी विश्वचषक स्पर्धेचे उपांत्य सामने खेळले जातील. तसेच विश्वचषकाचा अंतिम सामना हा 29 जून रोजी बारबाडोसमध्ये खेळला जाईल. साखळी फेरी संपल्यानंतर प्रत्येक ग्रपमधील दोन सर्वोत्तम संघ निवडले जातील, जे पुढे सुवर 8 फेरीत खेळीतल. सुपर 8 फेरीत जिंकणाऱ्या चार संघांमध्ये पहिला आणि दुसरा उपांत्य सामना खेळवला जाईल. यातूनच पुढे अंतिम सामन्याचे संघ निश्चित होतील.

आगामी टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. दोन्ही संघांना साखली फेरीत एकत्र म्हणजे ग्रु ए मध्ये ठेवले गेले आहे. 9 जून रोजी या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील लढत पाहायला मिळेल. ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तानव्यतिरिक्त आयर्लंड, कॅनडा आणि यजमना यूएसए हे संघ आहेत. 1 जून ते 18 जून यादरम्यान साखळी फेरी खेळली जाईल. त्यानंतर 19 ते 24 जूनदरम्यान सुवर 8 फेरी खेळवली जाईल, तर 26 आणि 27 जूनला उपांत्य सामने पार पडतील. 29 जून रोजी चाहते अंतिम सामन्यासाठी तयार असतील. भारताला साखळी फेरीतील आपले चार सामने 5, 9, 12 आणि 15 जून रोजी खेळायचे आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार भारताचे सर्व सामने सायंकाळी 8.30 मिनिटांनी सुरू होतील.

विश्वचषकातील आपला पहिला सामना भारताला न्यूयॉर्कमध्ये 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. दुसरा सामना भारतीय संघ 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध आणि तिसरा सामना 12 जून रोजी यूएसएविरुद्ध खेळेल. हे दोन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये आयोजित केले गेले आहेत. साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना भारताला कॅनडाविरुद्ध खेळायचा असून हा सामना 15 जून रोजी फ्लॉरीडामध्ये खेळायचा आहे.

टी-20 विश्वचषकात साखळी फेरीतील सामन्यांसाठी पाडलेले ग्रुप्स पुढीलप्रमाणे
ग्रुप ए – टीम इंडिया, पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए, कनाडा
ग्रुप बी – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलँड, ओमान
ग्रुप सी – न्यूजीलंड, वेस्टइंडीज, अफगानिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ग्रुप डी – दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, बांग्लादेश, नेदलंड्स, नेपाल
(schedule for T20 World Cup 2024 )

महत्वाच्या बातम्या –
IND vs SA । विदेशात भारतासाठी विराटपेक्षा भारी कोणीच नाही! मुख्य प्रशिक्षक द्रिवडचे आकडेही पडले फिके
‘डोकं लावत आहात…’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितचं मजेशीर उत्तर, पुन्हा लुटली मैफील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---