मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताला १३१ धावांची आघाडी घेण्यातही यश आले आहे. याबरोबरच भारताच्या विजयाच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
रहाणेने या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात २२३ चेंडूत ११२ धावा केल्या. यात त्याच्या १२ चौकारांचा समावेश आहे. हे रहाणेचे कसोटी कारकिर्दीतील १२ वे कसोटी शतक आहे. विशेष म्हणजे रहाणेची आत्तापर्यंतची कसोटी शतके नेहमीच भारताच्या पथ्यावर पडली असल्याचे आकडेवारीतून दिसून येत असल्याने भारतीय संघासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.
रहाणेने याआधी केलेल्या ११ शतकांपैकी एकही शतक भारताचा पराभव झालेल्या सामन्यातील नाही. म्हणजेच त्याने केलेल्या ८ शतकांनंतर भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर त्याची ३ शतके अनिर्णीत राहिलेल्या सामन्यातील आहे. त्यामुळे आता भारतीय संघासह भारतीय चाहत्यांनी ही अपेक्षा असेल की रहाणेचे १२ वे शतकही भारताच्या विजयाचे कारण ठरावे.
सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत रहाणे व्यतिरिक्त रविंद्र जडेजानेही ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३२६ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६ बाद १३३ धावा केल्या असून त्यांनी २ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याला’ बाद देणे चूकीचेच, मॅथ्यू वेडने व्यक्त केली नाराजी
असा प्रामाणिक क्रिकेटर होणे नाही! नाबाद असतानाही सोडलं मैदान