सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच आपल्या 24व्या ग्रँडस्लॅम पदकापासून अवघ्या काही अंतरावर आहे. जोकोविचक विंबलडन 2023च्या उपांत्य सामन्यात पोहोचला आहे. त्याने मंगळवारी (11 जुलै) खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात रूसच्या आंद्रे रुबलेव याचा पराभव केला आणि उपांत्य सामन्यात धडक दिली. उपांत्य सामन्यात जोकोविचपुढे इटलीच्या जॅनिक सिनर याचे आव्हान आहे.
नोवाक जोकोविच (Novak Djokovic) आणि आंद्रे रुबलेव (Andrey Rublev) यांच्यातील उपांत्यपूर्व सामना चांगलाच रोमांचक झाला. मंगळवारी झालेल्या या लढतीत जोकोविच सुरुवातीला मागे पडला होता. पण त्याने पुनरागमन करत सामना नावावर केला. पहिल्या डावात रूसच्या आंद्रे रुबवेलला आघाडी मिळाली होती. पण पुढच्या तिन्ही सेटमध्ये जोकोविच आघाडीवर होता. जोकोविचने हा सामना 4-6, 6-1, 6-4 आणि 6-3 अशा अंतराने जिंकला. अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी उपांत्य सामन्यात जोकोविचपुढे इटलीच्या जॅनिक सिनरचे आव्हान आहे. सिनरने आपल्या उपांत्यपूर्व सामन्यात रुसच्या रोमन रफिउलिन याला 6-4, 3-6, 6-2, 6-2 असे पराभूत केले होते. (Nopak Djokovic qualified for Wimbledon Open 2023 semi-finals)
महत्वाच्या बातम्या –
स्टीव स्मिथला धक्का! सहकारी खेळाडूची ICC रँकिंगमध्ये मोठी मजल, झाले ‘हे’ फेरबदल
मालिका गमावली, पण तिसऱ्या टी20त श्रीलंकेने घडवला इतिहास; न्यूझीलंडच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड