हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) च्या पर्वात नॉर्थ ईस्ट युनायटेड हा पहिल्या टप्प्यात एकही विजय न मिळवणारा एकमेव संघ आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांत पराभव पत्करलेला आहे, परंतु हिरो आयएसएलच्या या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात मुसंडी मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यासमोर घरच्या मैदानावर शनिवारी (24 डिसेंबर) एटीके मोहन बागानचे आव्हान आहे. एटीके मोहन बागान अव्वल स्थान व त्यांच्यातील अंतर आणखी कमी करण्याच्या प्रयत्नात मैदानावर उतरतील. ते 20 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत, तर अव्वल स्थानी असलेल्या मुंबई सिटीच्या खात्यात 24 गुण आहेत.
मागील तीन सामन्यांतील दोन पराभव हे नॉर्थ ईस्टला थोडक्यात पत्करावे लागले. एफसी गोवाविरुद्धच्या सामन्याचाही त्यात समावेश आहे. नवीन मुख्य प्रशिक्षक व्हिन्सेंझो ऍन्नेसे यांनी संघात आक्रमणाची कमी जाणवल्याचे म्हटले होते. नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या बचावपटूंचा कस लागणार आहे. विलमार जॉर्डनने मागील दोन सामन्यांत दोन गोल केले आहेत. रोमैन फिलिपोतीक्सच्या कौशल्यावर त्यांचे गोल होणे अवलंबून आहे. फ्रान्सच्या या खेळाडूने अनेक संधी निर्माण केल्या आहेत, परंतु त्याला एकच गोल करता आला आहे.
”मागील काही काळात आमचा खेळ बराच सुधारलेला आहे. खेळाडूंना आता माझी फिलॉसॉपी समजू लागली आहे. यापूर्वी ते वेगळ्या पद्धतीने सराव करत होते, परंतु मागील 14 दिवसांत मला अपेक्षित सराव ते करत आहेत. आम्ही शारीरिक सरावावर काम करत आहोत,” असे व्हिन्सेंझो म्हणाले.
एटीके मोहन बागानला मागील सामन्यात ड्रॉवर समाधान मानावे लागले आणि यंदाच्या पर्वात प्रथमच त्यांना गोल करता आलेला नाही. पण, मागील चार सामन्यांत त्यांची अपराजित मालिका कायम आहे आणि त्यांनी सलग चार सामन्यांत क्लीन शीट राखले आहे. ह्युगो बौमोसने आतापर्यंत तीन गोल आणि तीन गोल सहाय्य केले आहे. मागील चार सामन्यांत यापैकी निम्मे गोल आलेत. मागील आठवड्यात ह्युगो बाकावर बसलेला होता, परंतु उद्या तो सुरुवातीपासून मैदानावर दिसेल.
”दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे आणि आता सर्वांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. आता तीन गुण मिळवण्यासाठी तयार राहणे महत्त्वाचे आहे. सर्व संघांसाठी अखेरचे 10 सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. नॉर्थ ईस्ट युनायटेडला आता निकालपेक्षा चांगला खेळ करायचा आहे आणि त्यामुळे हा सामना आमच्यासाठी आव्हानात्मक असेल,”असे मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो म्हणाले.
???? ???????????????????????????????? ????
A Christmas Eve clash, as the Highlanders take on the Mariners in our final home game of 2️⃣0️⃣2️⃣2️⃣#NEUATKMB #NEUFC #StrongerAsOne #8States1United pic.twitter.com/S154CHTMSH
— NorthEast United FC (@NEUtdFC) December 24, 2022
उभय संघांमध्ये झालेल्या 7 पैकी पाच सामन्यांत एटीके मोहन बागानने पाच विजय मिळवले होते, नॉर्थ ईस्टने एक विजय मिळवला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं
मुंबई सिटी एफसी आणि चेन्नईयन एफसी यांच्यात गोलधमाका अपेक्षित, शनिवारी भिडणार






