---Advertisement---

जागतिक विक्रम करत सुवर्णपदक जिंकलेल्या ‘त्या’ खेळाडूने चक्क सुपरमॅनसारखी फाडली जर्सी, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, ऑगस्ट 3, 2021 5:26 PM
---Advertisement---

सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वच देशातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान अनेक खेळाडू विविध विक्रम करतानाही दिसत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल शर्यतीमध्ये नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहोमने मंगळवारी (३ ऑगस्ट) जागतिक विक्रम करत सुवर्ण पदक जिंकले आहे. जवळपास एका सेकंदाच्या फरकाने विक्रम करत त्याने सुवर्ण पदक जिंकले आहे.

त्यानंतर त्या खेळाडूने मैदानातच सुपरमॅनसारखी आपली जर्सी फाडली. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या शर्यतीत वॉरहोल व्यतिरिक्त अमेरिकेच्या राय बेंजामिनने ही विश्व विक्रम मोडला आहे. दोन वेळा विश्व विजेता असलेल्या वॉरहोमने अंतिम फेरीत ४५.९४ सेकंदांसह विजय मिळवला आहेत. ही शर्यत पूर्ण करणाऱ्या सात पैकी सहा धावपटूंनी एक प्रादेशिक किंवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. वॉरहोमने यापूर्वी १ जुलै रोजी ओस्लो येथे ४६.७० सेकंदांसह विश्व विक्रम केला होता. याचबरोबर आता त्याने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

https://twitter.com/MediaWithSports/status/1422400667034038283

त्याच बरोबर या शर्यतीत रौप्य पदक जिंकणारा बेंजामिन याने ४६.१७ सेकंद सोबतच आपला जुना विक्रम ही मोडीत काढला आहे. याच शर्यतीत ब्राजीलचा एलिसन डोस सांतोसने कांस्य पदक जिंकले आहे. डॉसने ही शर्यत पूर्ण करण्यासाठी एकूण ४६.७२ सेकंद घेतले आहेत. जेव्हा वारहोलला कळले की, त्याने जागतिक विक्रम करत सुवर्ण पदक जिंकले आहे, तेव्हा त्याने तो आनंद आपली जर्सी फाडून साजरा केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

“भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्टी होती, मग आम्हाला इंग्लंडमध्ये वेगवान पीच बनवण्याचा हक्क आहे”

कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना? जाणून घ्या सर्वकाही

वडिलांच्या आठवणीने आजही विराट होतो भावूक; म्हणाला, ‘आज ते इथे असते तर..’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---