रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. अजिंक्य रहाणे याला या सामन्यासाठी मंगळवारी (25 एप्रिल) निवडलेल्या संघात संधी मिळाली आहे. बीसीसीआयकडून 15 सदस्यीय संघाची घोषणा केली गेली असली, तरी एकूण 19 खेळाडू या सामन्यासाठी इंग्लंड दौरा करणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अलिकडे चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका (BGT) खेळली गेली. या मालिकेदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळणारे दोन्ही संघ निश्चित झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात यावर्षी डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला जाणार हे निश्चित झाल्यानंतर चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. ताज्या माहितीनुसार भारतीय संघात निवड झालेले 15 खेळाडू आणि त्यांच्यासोबत चार अतिरिक्त खेळाडूही आयपीएल संपल्यानंतर या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होतील.
डब्ल्यूटीसी फायनसाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघातून प्लेइंग इलेव्हन निवडली जाईल. मात्र या 15 खेळाडूंव्यतिरिक्त चार खेळाडू असे आहेत, जे फक्त सराव सत्रात आपली भूमिका पार पाडणार आहेत. माहितीनुसार कुलदीप सेन, नवदीप सैनी, मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांना नेट गोलंदाज म्हणून संघासोबत इंग्लंडला जाण्याची संधी मिळणार असल्याचे माध्यमांमध्ये बोलले जात आहे. दरम्यान, मुकेश कुमार सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल खेळत आहे. तर कुलदीप सेन आणि नवदीप सैनी राजस्थान संघाचा भाग आहे. तसेच उमरान मलिक सनरायझर्स हैदराबादाकडून खेळत आहे. (Not 15, India’s 19 players will tour England for the WTC final)
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडलेला भारताचा 15 सदस्यीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागच्या 10 डावात 11च्या सरासरीने धावा करूनही राहुल खेळणार डब्ल्यूटीसी फायनल! निवडकर्त्यांचा निर्णय कितपत योग्य?
GTvsMI । नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी, पण महत्वाचा खेळाडू सामन्यात बाहेर