आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मंगळवार, 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav under Captaincy) नेतृत्वाखाली भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध आपल्या स्पर्धेला सुरुवात करेल. इंग्लंडमध्ये शानदार कामगिरी करणारा शुबमन गिल (Shubman gill) संघाचा उपकर्णधार आहे. शुबमन गिलच्या संघात येण्यामुळे संजू सॅमसनला (Sanju Samson) बाहेर बसावे लागू शकते.
गेल्या एका वर्षात गिलने जास्त टी20 सामने खेळलेले नाहीत, तरी त्याला संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असेल. हेच माजी भारतीय विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) सांगितले आहे.
क्रिकबजशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, शुबमन गिल हा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. कार्तिक म्हणाला, माझ्या मते आशिया कप 2025 मध्ये सर्वाधिक धावा गिल करणार आहे. त्याचा फॉर्म फक्त छानच नाही तर त्यांना स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. तो टी20 संघाचा नियमित भाग नाही, त्यामुळे तो चांगली कामगिरी करेल.
कार्तिकच्या मते, वरुण चक्रवर्ती (Varun chakrawarthy) , ज्याने दुबईत अप्रतिम कामगिरी केली आहे, तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. कार्तिक म्हणाला, मला वाटते की जो गोलंदाज दुबईच्या खेळपट्टीवर सातत्याने छान कामगिरी करतो, मग तो आयपीएल असो किंवा अलीकडे संपलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत, तो वरुण चक्रवर्ती आहे.
त्याचबरोबर, कार्तिक म्हणाला की, जितेश शर्मा (Jitesh Sharma) हा या स्पर्धेमध्ये सगळ्यांना आश्चर्यचकित करू शकतो. कार्तिक म्हणाला, जितेश शर्मा टी20 क्रिकेटमध्ये परत येत आहे. आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म शानदार होता. त्याच्यात अशी क्षमता आहे की, तो अंतिम ओव्हर्समध्ये, मग रन चेज करत असो किंवा टार्गेट सेट करत असो, उत्कृष्ट ठरू शकतो.






