जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीची गणना केली जाते. धोनीने अनेकवेळा यष्ट्यांमागे अफलातून कामगिरी करत सामन्याचा निर्णय बदलून टाकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चर्चेत राहत असतो. अशाच प्रकारे आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील दुसऱ्या टी२० सामना रविवारी (६ डिसेंबर) झाला. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला. यादरम्यान ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने धोनीबाबत वक्तव्य केले आहे.
झाले असे की, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १९४ धावांचा डोंगर उभा केला होता. या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सलामीला शिखर धवन आणि केएल राहुल फलंदाजीला उतरले होते. यादरम्यान भारतीय संघाला ५६ धावांवरच राहुलच्या रूपात पहिला धक्का बसला. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. धवन आणि विराट हळूहळू डाव सावरत धावफलक हलता ठेवत होते.
भारतीय डावाच्या नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक मॅथ्यू ज्ञवेडने धवनला चपळाईने यष्टीचीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यात अपयशी ठरला. त्यानंतर, वेड धोनीबाबत धवनशी बोलताना दिसला. यादरम्यान वेडच्या संवादाचा व्हिडिओ एका चाहत्याने ट्विटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये वेड म्हणत आहे की, ‘मी केले ते धोनी सारखे नव्हते. तितके वेगवान नव्हते.’
याचा संदर्भ घेत हे एका चाहत्याने ट्वीट करताना लिहिले की, ‘धोनीने जो दर्जा तयार करुन ठेवलाय तो अविश्वसनीय आहे. सर्व जण त्याच्यावर प्रेम करतात.’
Not Dhoni, not quick enough like MS Dhoni! – Wade
The standard that Dhoni has set is beyond commendable. Everyone loves that man.❤️🥺#AUSvIND #indvsausT20 pic.twitter.com/oyDpIupgHw
— UrMiL07™ (@urmilpatel30) December 6, 2020
ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान भारतीय संघाने १९.४ षटकात पूर्ण केले. या विजयानंतर २२ चेंडूत ४४ धावांची आतिशी खेळी करणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील तिसरा आणि अखेरचा टी२० सामना सिडनी येथे मंगळवारी (८ डिसेंबर) खेळण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्याने गगनचुंबी षटकार ठोकत भारताच्या विजयावर केले शिक्कामोर्तब; पाहा भन्नाट Video
मालिका विजयानंतर भारतीय खेळाडूंचे ‘डबल सेलिब्रेशन’, ‘या’ ३ धुरंधरांचा वाढदिवस केला साजरा
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर