आरसीबी (Royal Challengers bangaluru) संघाचं 17 वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. आयपीएल 2025 (IPL 2025) च्या फायनल सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदा ट्रॉफीवर त्यांचे नाव कोरले. आरसीबी सोबतच विराट कोहलीची देखील 17 वर्षांची प्रतिक्षा संपली. संघ चॅम्पियन ठरल्यावर विराट मैदानावरच रडताना दिसला. आता विराट विषयी वीरेंद्र सहवाग यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. जाणून घ्या ते काय म्हणाले
सहवाग यांचं म्हणणं आहे की, ट्रॉफीसाठी विराटपेक्षा जास्त वाट सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पाहिली होती. जेव्हा सहवाग यांना आरसीबीला खूप प्रतीक्षेनंतर ट्रॉफी मिळाली याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, विराटपेक्षा सचिनने वनडे वर्ल्डकप साठी खूप वाट पाहिली आहे. ते म्हणाले, कोहलीने फक्त 18 वर्षे वाट पाहिली पण सचिन तेंडुलकरने वर्ल्डकप ट्रॉफीसाठी 1989 पासून 2011 पर्यंत वाट पाहिली आहे. अशा परिस्थितीत कोहलीने कमी वाट पाहिली आहे. यानंतरही सचिनने संयम सोडला नाही. सचिनने ठरवले होते की, जोपर्यंत ट्रॉफी जिंकणार नाही, तोपर्यंत रिटायरमेंट घोषित करणार नाही.
पुढे बोलताना सहवाग म्हणाले, ट्रॉफी जिंकल्यानंतर आता विराट आनंदी असेल. तसेच तो आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती देखील घेऊ शकतो. कोणताही खेळाडू ट्रॉफी जिंकण्यासाठीच खेळतो. पैसे तर येत जात असतात पण ट्रॉफी जिंकणे सोपे नसते. तसेच विराट कोहलीने (Virat Kohli) या हंगामात संघासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलं होतं.






