ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग त्याच्या वादाग्रस्त वक्तव्यामुळे ओळखला जातो. अलीकडेच त्याने बाॅर्डर-गावस्कर मालिकेवर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की आगामी बाॅर्डर-गावस्कर मालिका ऑस्टेलिया 3-1 अश्या फरकानं जिंकेल. त्याच्या या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.
वास्तविक, आता त्याने जो रूटबद्दल एक मोठी भविष्यवाणी केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. येत्या काही वर्षांत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडू शकतो, असा विश्वास पॉन्टिंगला वाटतो. पॉन्टिंगने सांगितले की, जर रूटने त्याचा सध्याचा फॉर्म आणि धावा करण्याची भूक कायम ठेवली तर तो सचिनचा 15921 धावांचा विक्रम मागे टाकू शकतो.
अलीकडेच, जो रूटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत 12000 धावांचा टप्पा ओलांडला आणि कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो सातवा फलंदाज ठरला. आतापर्यंत त्याने 143 कसोटी सामन्यांमध्ये 50.11 च्या सरासरीने 12,027 धावा केल्या आहेत. ज्यात 32 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुट सध्या सातव्या स्थानावर आहे. पाँटिंगच्या मते, तो लवकरच श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या 12,400 धावा आणि त्याचा माजी सहकारी ॲलिस्टर कुकच्या 12,472 धावांना मागे टाकू शकतो. रुटमध्ये तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या जवळ येण्याची क्षमता आहे, असे पॉन्टिंगचे मत आहे.
अलिकडच्या वर्षांत रूटने आपल्या खेळात सुधारणा केली असून सातत्य राखण्यात तो यशस्वी ठरल्याचेही पाँटिंगने म्हटले आहे. तो म्हणाला, “चार-पाच वर्षांपूर्वी अनेकवेळा 50 धावा केल्यानंतर त्याला शतक झळकावता येत नव्हते, पण आता प्रत्येक वेळी 50 धावा पार केल्यानंतर तो मोठे शतक झळकावत आहे. हा त्याचा सर्वात मोठा बदल आहे.”
सचिन तेंडुलकरच्या नावावर 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा आहेत, तर पाँटिंग स्वतः 168 कसोटी सामन्यांमध्ये 13,378 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पॉन्टिंग ‘आयसीसी रिव्ह्यू’मध्ये म्हणाला – “रूटमध्ये हे करण्याची क्षमता आहे. तो 33 वर्षांचा आहे आणि 3000 धावांनी मागे आहे. जर तो दरवर्षी 10 ते 14 कसोटी सामने खेळला आणि वार्षिक 800 ते 1,000 धावा केला तर तो हे काम 3 वर्षात करु शकतो.
हेही वाचा-
24 वर्षीय गोलंदाजासमोर अफ्रिकन संघ ढेपाळला, शामर जोसेफची ऐतिहासिक कामगिरी
आयपीएलचा रोमांच आणखी वाढणार, बीसीसीआयने बनवली नवी योजना! पाहा होणारे बदल
टीम इंडियाला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक; हेड कोच गंभीरच्या ‘निर्णयावर’ जय शहांची मोठी प्रतिक्रिया