ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून पुरूषांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जाणार आहे. यामध्ये सहभागी असलेल्या देशांनी आपापल्या 15 सदस्यीय मुख्य टी20 संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत दोन खेळाडू असे आहेत ज्यांचा हा आठवा टी20 विश्वचषक असणार आहे. याचा अर्थ हे दोन्ही खेळाडू प्रत्येक टी20 विश्वचषकात खेळलेले आहेत. यातील पहिला खेळाडू भारताचा कर्णधार रोहित शर्मा आहे. भारताने 2007चा पहिला टी20 विश्वचषक एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली जिंकला. त्या स्पर्धेत रोहित भारतीय संघात होता.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील निवडसमितीने संघाची घोषणा करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा दिली. रोहित हा टी20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणारा केवळ तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी एमएस धोनी (MS Dhoni) व विराट कोहली (Virat Kohli) यांनीच टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते.
रोहितने 2007 टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध डरबन येथे पदार्पण केलेले. त्यानंतरच्या 2009, 2010, 2012, 2014, 2016 ते मागील वर्षी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे झालेल्या विश्वचषकातही खेळला होता. रोहितने आतापर्यंत 7 विश्वचषकात खेळताना 33 सामन्यांच्या 30 डावात 38.50 च्या सरासरीने व 131.52 च्या स्ट्राईक रेटने 847 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने आठ अर्धशतके ठोकलीत. तर आठही विश्वचषक खेळणारा दुसरा खेळाडू बांगलादेशचा आहे.
बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा टी20 विश्वचषकाच्या प्रत्येक हंगामाचा भाग राहिला आहे. यावेळी तो संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने टी20 विश्वचषकात एकूण 31 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 26.84च्या सरासरीने 698 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 41 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने नुकत्याच झालेल्या आशिया चषकात संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती.
या खेळाडूंकडे होती संधी आठवा विश्वचषक खेळण्याची
ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो, मुश्फिकुर रहमान, शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज यांनी 2007 ते 2021 असे लागोपाठ टी20 विश्वचषक खेळले आहेत. मात्र यंदा ते या स्पर्धेला मुकले आहेत. ब्रावो, रहमान आणि हाफिज यांनी निवृत्ती घेतली आहे, तर बाकींना संघात जागा दिली गेली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात बदलता येणार प्लेइंग XI, आयपीएलसाठी आणलेला ‘इम्पॅक्ट प्लेयर नियम’ नेमका काय?
अंगावर काटा आणणारी घटना! इंग्लंडच्या क्रिकेटरचे कुटुंबीय सापडले व्हेलच्या तावडीत, मग..
पुन्हा दिसले युसूफचे रौद्ररूप, झंझावाती अर्धशतकासह इंडियाला 6 विकेट्सने जिंकून दिला सामना






