---Advertisement---

सचिन नाही, तर हा आहे अर्जुन तेंडुलकरचा आवडता खेळाडू; वडिलांना डावलून घेतल ‘या’ खेळाडूचं नाव

On: गुरूवार, एप्रिल 2, 2026 6:52 PM
---Advertisement---

सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये सध्या चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरूवात करणारा अर्जुन तेंडुलकर आता लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. वडील सचिन तेंडुलकरचा वारसा पुढे चालवण्याचा दबाव नेहमीच असणाऱ्या अर्जुनने एका पॉडकास्टमध्ये आपली मतं मांडली आहेत. जेव्हा त्याला त्याच्या फलंदाजीतील आदर्श व्यक्तीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने आपल्या वडिलांशिवाय इतर खेळाडूचं नाव घेतलं.

आयपीएल २०२६च्या लिलावापूर्वी, अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सकडून लखनौ सुपर जायंट्सकडे शार्दुल ठाकूरच्या बदल्यात ३० लाख रुपयांना ट्रेड करण्यात आलं. २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुनला २० लाख रुपयांना विकत घेतलं आणि नंतर फ्रँचायझीने त्याला संघात कायम ठेवलं. अर्जुनने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं होतं.

अर्जुनने स्पष्टपणे सांगितले की त्याला युवीचा निर्भीड दृष्टिकोन आणि फलंदाजीची शैली आवडते. मात्र, त्यांच्या गोलंदाजीची तुलना करताना तो गंमतीने म्हणाला, “तो फिरकी गोलंदाज होता आणि मी वेगवान गोलंदाज आहे.” आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच अर्जुनने संघ बदलला. मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरच्या बदल्यात त्याला लखनौकडे पाठवले. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सलामीच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी दिली नाही.

शुभंकर मिश्रा पोडकास्टमध्ये अर्जुन तेंडुलकर उपस्थित राहिला होता. अर्जुनला यावेळेस प्रश्न विचारण्यात आला की, सचिन तेंडुलकरशिवाय क्रिकेटमधील आदर्श खेळाडू कोण आहे, यावर त्याने उत्तर दिलं, युवराज सिंग. अर्जुनने सांगितलं की त्याला युवीचा निर्भीड दृष्टिकोन आणि फलंदाजीची शैली आवडते. मात्र, त्याच्या गोलंदाजीची तुलना करताना तो गंमतीने म्हणाला, “तो फिरकी गोलंदाज होता आणि मी वेगवान गोलंदाज आहे.”

अर्जुन २०२१ ते २०२५ दरम्यान मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये ५ सामने खेळला. याबाबत अर्जुनला प्रश्न विचारण्यात आला की, “तू मुंबई इंडियन्सकडून काही सामने खेळलास आणि चांगली गोलंदाजीही केलीस. तुझा स्विंगही चांगला होता, मग तुला अधिक संधी मिळायला हव्या होत्या असं वाटलं का?” यावर अर्जुनने उत्तर दिलं, “प्रत्येक खेळाडूला जास्तीत जास्त संधी हव्या असतात. कुणालाही बसून राहायचं नसतं. पण खेळाडूने मेहनत करत राहणं आणि संधी मिळाल्यावर पूर्ण फायदा घेणं, हेच महत्त्वाचं असतं.”

रणजी ट्रॉफीसाठी गोव्यात खेळण्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असता, अर्जुनने सांगितलं की मुंबई सोडण्याचा त्याचा निर्णय पूर्ण विचार करून घेतलेला होता आणि अधिक संधी मिळाव्यात हा त्यामागचा मुख्य हेतू होता. मुंबईच्या क्रिकेटमध्ये स्पर्धा खूप तीव्र आहे, हे त्याने मान्य केलं आणि गोव्यासाठी खेळल्याने स्वतःचा खेळ अधिक विकसित होईल, असा त्याचा विश्वास होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---