भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली संघात नव्हता. त्याचसोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हादेखील फिटनेसच्या कारणास्तव संघातून बाहेर आहे. उभय संघांतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. त्याआधी मोहम्मद शमी याने विराट कोहलीविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
मोहम्मद शमी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला सर्वोत्तम फलंदाजाविषयी प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना शमीने विराट कोहली याचे नाव घेतले. पण हा प्रश्न एक नाही, तर दोन भागांमध्ये विचारला गेला. वेगवान गोलंदाजानेही या प्रश्नांची उत्तरे रंजक पद्धतीने दिले.
मोहम्मद शमी () याने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत गोलंदाजाला प्रश्न विचारला गेला की, “भारताचा सर्वोत्तम फलंदाज कोन आहे?” या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने विराट कोहली याचे नाव घेतले. यानंतर त्याला पुढचा प्रश्न असा विचारला गेला की, “जगातील सर्वोत्तम फलंदाज कोण आहे?” यावर शमीने म्हणाला, “आत्ताच तर नाव घेतले होते. विराट कोहली.” म्हणजे शमीने दोन्ही वेळी विराट कोहलीच्या नावाने उत्तर दिले.
Question – Best batsman in India?
Shami – Virat Kohli.Question – Best batsman in the World?
Shami – Virat Kohli. pic.twitter.com/m0J0UbJOZV— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 7, 2024
दरम्यान, शमी मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करू शकला. त्याने संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि भारत अंतिम सामन्यात पोहोचली. वनडे विश्वचषाकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्यानंतर शमी दुखापत आणि फिटनेसच्या कारणास्तव भारतीय संघातून बाहेर आहे.
दुसरीकडे भारतीचा स्टार फलंदाज विराट कोहली हादेखील संघातून बाहेर आहे. विराटने वैयक्तिक कारण देत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली होती. तिसऱ्या सामन्यातून तो पुनरागमन करण्याची शक्यता चाहत्यांना आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘आशा आहे त्याच्या घरी सर्वकाही ठीक सुरू असेल’, विराटच्या कमबॅकविषयी दिग्गजाची प्रतिक्रिया
14 फेब्रुवारीला बदलले जाणार राजकोट स्टेडियमचे नाव, कार्यक्रमाला जय शाहांसह खास पाहुण्यांची उपस्थिती लागणार