सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचला सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्याने लाईन अंपायरला बॉल मारल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तो या स्पर्धेतील अव्वल मानांकित टेनिसपटू होता. ही घटना रविवारी अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत घडली.
चौथ्या फेरीत जोकोविचचा सामना स्पेनच्या पाब्लो कार्रेनो बुस्टाविरुद्ध सुरु होता. त्यावेळी पहिल्या सेटमध्ये जोकोविच ५-६ असा पिछाडीवर असताना त्याने खिशातील बॉल काढून लाईन अंपायरच्या दिशेने मारला. तो बॉल लाईन अंपायर असलेल्या महिलेच्या गळ्याला लागला. या घटनेनंतर जोकोविच लगेचच तिची चौकशी करण्यासाठी तिच्याजवळ गेला होता. काहीवेळानंतर ती उठून कोर्टबाहेर गेली.
यानंतर बराचवेळ जोकोविच स्पर्धेचे रेफ्री सोरन फ्रेंमेल आणि ग्रँड स्लॅम पर्यवेक्षकांबरोबर चर्चा करताना दिसला. पण अखेर त्याला अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय मान्य करावा लागला आणि तो बुस्टाबरोबर आणि चेअर अंपायरबरोबर हात मिळवून कोर्टबाहेर गेला.
Wow. Novak Djokovic has been defaulted from the #USOpen after striking a lineswoman with a ball.
— Sacha Pisani (@Sachk0) September 6, 2020
जोकोविचच्या बाहेर जाण्याने आता अमेरिकन ओपनला यावेळी नवा विजेता मिळेल. कारण यावेळी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोन्ही टेनिसपटूंनी या स्पर्धेतून माघार घेतली होती. याआधी २०१४ ला मारिन सिलिकने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
तसेच ग्रँड स्लॅममधील स्पर्धेतून खेळाडूच्या चूकीच्या व्यवहारामुळे बाहेर होणारा जोकोविच १९९० नंतरचा पहिला खेळाडू आहे. याआधी ऑस्ट्रेलियन ओपन १९९० च्या स्पर्धेतून जॉन मॅकएन्रोए अशा प्रकारे बाहेर गेला होता.
रविवारी झालेल्या घटनेनंतर जोकोविचने सर्वांची माफी मागितली असून यातून तो एक खेळाडू आणि व्यक्ती म्हणून अधिक चांगला विकसित होण्यासाठी हा धडा असेल, असे म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/CE0AzAOH2cp/
जोकोविचने आत्तापर्यंत १७ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या पुरुष टेनिसपटूंमध्ये फेडरर आणि नदालनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ८७४ विकेट्स घेणाऱ्या या क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती; हे आहे कारण
आयपीएल २०२०: केएल राहुल कर्णधार असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे संपूर्ण वेळापत्रक
जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्स पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल
ट्रेंडिंग लेख –
फलंदाजांनो तयार रहा, ‘हे’ ३ भारतीय गोलंदाज आयपीएलच्या एका डावात उडवू शकतात ५ फलंदाजांची दांडी
एक के बाद एक सिक्स! ‘हे’ ३ भारतीय धुरंदर यंदा युएईच्या मैदानावर पाडतील षटकारांचा पाऊस
वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा प्रज्ञान ओझा