फ्रेंच ओपन 2023 मधील 8 व्या दिवशी विजयावर आपले नाव कोरत कार्लोस अल्काराझ, नोव्हाक जोकोविच, स्टिफानोस त्सित्सिपास आणि आर्यना सबालेन्का यांनी रविवारी (4 जून) उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. फ्रेंच ओपन हा सामना या वर्षीच्या स्पर्धेतील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक ठरला आहे. याचे कारण म्हणजे, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अल्काराझने इटालियन स्टार लोरेन्झो मुसेट्टीवर मात करत गेल्या वर्षीच्या हॅम्बुर्ग ओपनच्या अंतिम फेरीतील आपल्या पराभवाचा बदला घेतला.
यूएस ओपन चॅम्पियनला म्हणजेच अल्काराझला मुसेट्टीविरुद्धच्या पहिल्या कठीण ड्रॉचा सामना करावा लागला पण खेळ एकतर्फी झाला. अल्काराझने खेळाच्या निती बदलल्या आणि केवळ दोन तास आठ मिनिटांत 6-3, 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवला. त्याने अशी कामगिरी करत रोलँड-गॅरोस येथील इटालियन संघाची धावसंख्या संपुष्टात आणली आहे. दरम्यान, अल्काराझने या वर्षातील दुसर्या ग्रँडस्लॅममधला हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना असल्याचा दावा केला आहे. सामना संपल्यानंतर तो म्हणाला, “मला वाटते की हा माझा आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वोत्तम सामना होता. हो, मला वाटते की मी यामध्ये उत्तम खेळी केली आहे.”
जोकोविचने मोडला नदाकचा विक्रम
प्रमुख चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) आपली फ्रेंच ओपनमधील घोडदौड कायम ठेवत जुआन पाब्लो व्हॅरिलासवर (Juan Pablo Varillas) 6-3, 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवला. या वर्षीच्या फ्रेंच ओपनमध्ये सर्बियन दिग्गजाने अद्याप एकही सेट गमावलेला नाही. याचे प्रमुख कारण त्याने सांगितले की, ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे लक्ष्य आम्ही कायम ठेवले आहे. दरम्यान, ही 17 वी वेळ आहे जेव्हा सर्बियन खेळाडूने 16 उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवत राफेल नदालचा विक्रम मोडला आहे. तसेच रोलँड-गॅरोसच्या अंतिम आठमध्येही प्रवेश मिळवला आहे.
सेबॅस्टियन ऑफनरच्या आव्हानावर स्टिफानोसची मात
रविवारी झालेल्या आणखी एका मोठ्या लढतीमध्ये स्टिफानोस त्सित्सिपासने (Stefanos Tsitsipas) चौथ्या फेरीवेळी सेबॅस्टियन ऑफनरच्या आव्हानावर मात केली. ग्रीकच्या अव्वल मानांकित स्टारने 7-5, 6-3, 6-0 असा विजय आपल्या नावी नोंदवला आहे. मंगळवारी (6 जून) उपांत्यपूर्व फेरीत स्टेफानोस कार्लोस अल्काराझ सोबत खेळताना दिसून येईल. तर दुसरीकडे, जोकोविचचा सामना 11व्या मानांकित रशियाच्या कारेन खाचानोव्हशी (Karen Khachanov) होणार आहे. शिवाय, पुढील फेरीत आणि उपांत्य फेरीत कार्लोस अल्काराझचा (Carlos Alcaraz) सामना करावा लागेल.
सबालेन्काचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित
दरम्याान, महिलांच्या खेळी बद्दल बोलायचे झाले तर, महिला एकेरी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेन्काने यूएसएच्या स्लोएन स्टीफन्सचा 7-6, 6-4 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. बेलारूसच्या या स्टारने आपल्या खेळामध्ये प्रगती करत यावर्षीच्या आपल्या ग्रँड स्लॅम विजयाची धावसंख्या 11 सामन्यांपर्यंत वाढवली आहे. तसेच, शेवटच्या आठ सामन्यात तिची युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाविरुद्ध लढत पाहायला मिळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?