टेनिस विश्वातील तिसरी मोठी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा म्हणजे विम्बल्डन. सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेतील बाद फेरीचे सामने सुरू आहेत. पुरूष एकेरीच्या पहिल्या बाद फेरीच्या सामन्यात सर्बियाचा नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने पहिले दोन सेट गमावत उत्तम पुनरागमन केले आहे. त्याने इटलीच्या यानिक सिनर (Jannik Sinner) याला पाच सेटमध्ये ५-७, २-६, ६-३, ६-२, ६-२ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे.
या सामन्यानंतर जोकोविचने हा सामना विशेष असे म्हणत सिनरला शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला, “पहिले दोन सेट आणि नंतरचे तीन सेट हे या सामन्यातील वेगवेगळे होते. पहिल्या दोन सेटमध्ये त्याने परिपक्व खेळाडूसारखे खेळले. नंतरच्या तिसऱ्या सेटआधी थोडा ब्रेक घेत मी स्वतशी थोडेफार बोलून माझे मनोबल उंचावत एकाग्रपणे खेळ केला.”
तब्बल ११वेळा जोकोविच विम्बल्डनच्या उपांत्यफेरीत पोहोचला आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा ४७वा पाच सेटचा सामना होता, तर सिनरचा पाच सेटचा हा पाचवाच सामना होता.
जोकोविचच्या कारकिर्दीत त्याने पहिले दोन सेट गमावत आधीही सामने जिंकले आहे. या सामन्यात पुन्हा एकदा अशी कामगिरी करण्याची त्याची ही सातवी वेळ आहे. “तिसऱ्या सेटमध्ये लवकर गुण मिळवत मी पाहिले विचार केला जेणेकरून मला पुढे चांगला खेळ करता आला. या कोर्टवर मला भरपूर अनुभव आहे. येथे मी प्रचंड दबावाखालीही सामने जिंकले आहेत. त्याचाच मला आता फायदा झाला,” असेही जोकोविचने पुढे म्हटले आहे.
This is how champions play 💫
Over to you, @DjokerNole… #Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/fn5KXfpxUo
— Wimbledon (@Wimbledon) July 5, 2022
जोकोविचने २०२१च्या फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत लोरेंझो मसेटीच्या विरुद्ध पहिले दोन सेट गमावत सामना जिंकला होता. नंतर पुढे अंतिम फेरीतही स्टिफानोस त्सित्सिपास विरुद्ध पहिले दोन सेट गमावत विजेता ठरला होता.
जोकोविचने ऑल इंग्लंड क्लबचे २६ सामने जिंकले आहेत. त्याची उपांत्य फेरीत ब्रिटीश टेनिसपटू कॅमेरून नोरी याच्याशी सामना होणार आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत बेल्जिमच्या डेविड गॉफीनचा ३-६, ७-५, २-६, ६-३, ७-५ असा पराभव केला आहे.
जोकोविचने त्याच्या कारकिर्दीत सहा वेळा विम्बल्डन जिंकले आहे. यंदा तो चॅम्पियन ठरला तर तो पीट सॅम्प्रसची बरोबरी करेल. अमेरिकेच्या सॅम्प्रस हे सात वेळा विम्बल्डनचे चॅम्पियन ठरले आहेत. विम्बल्डनमधून शेवटी नोवाक पाच वर्षापूर्वी लवकर बाहेर झाला होता. २०१७च्या विम्बल्डनमध्ये तो उपांत्यपूर्व फेरीतून तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता.
Never write off Novak Djokovic. Ever.#Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/W79hRF6KV3
— Wimbledon (@Wimbledon) July 5, 2022
टेनिसच्या कारकिर्दीत एकेरीचे २० ग्रॅडस्लॅम जिंकणाऱ्या जोकोविचकडे २१वे ग्रॅडस्लॅम जिंकण्याची संधी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला हॉकी विश्वचषक: वंदना कटारियाच्या गोलने भारत ‘सेफ झोन’मध्ये
टीम इंडियाचा महागुरूही शोधतोय ‘बझबॉल’चा अर्थ, राहुल द्रविडने दिलेले उत्तर होत आहे व्हायरल