भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळातून जात आहेत. तो धावा करण्यात सतत अपयशी ठरत असल्याने त्याच्या संघातील जागेवर अनेक आजी-माजी खेळाडूंनी आपापली विधाने व्यक्त केली आहेत. त्यातील काहींनी त्याच्यावर कडक शब्दांत टिकाही केल्या आहेत. त्याला संघाबाहेर काढावे, अशी मागणी काही जण करत असताना त्याच्या संघ सहकाऱ्यांनी आणि माजी खेळाडूंनी त्याची पाठराखण केली आहे. यामध्ये काही परदेशी खेळाडूंचा देखील समावेश आहे.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन (Kevin Pietersen) यानेही विराट कोहली (Virat Kohli) याची बाजू घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत विराटची पाठराखण केली आहे. क्रिकेट व्यतिरिक्त टेनिस विश्वातूनही कोहलीचा बचाव केला जात आहे. यामध्ये टेनिसचा दिग्गज नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याचा समावेश आहे. त्याने पीटरसनच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
पीटरसनने विराटसोबतचा फोटो टाकत पोस्टमध्ये म्हटले, “तू जे केले आहे, त्याची लोक स्वप्न पाहात असतात. मित्रा, तुझी कारकिर्द इतकी उत्तम आहे की एखाद्या महान खेळाडूला तुझ्यासारखी कामगिरी करण्याची इच्छा होते. यामुळे तू अभिमान बाळग आणि जीवनाचा आनंद घे. तु लवकरच पुनरागमन करणार,” याला जोकोविचने लाईक केले आहे. जोकोविचने यंदाच्या विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. त्याने सलग चौथ्यांदा आणि कारकिर्दीत सातव्यांदा विम्बल्डन जिंकण्याची कामगिरी केली आहे. यामुळे त्याचे हे आतापर्यतचे २१वे ग्रॅंड स्लॅम ठरले आहे.
पीटरसन आणि जोकोविचच्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने विराटची बाजू घेतली आहे. त्यानेही ट्वीट करत विराटची पाठराखण केली. त्यामध्ये तो म्हणाला, ‘ही वेळही निघून जाईल. मजबूत राहा.’ त्याच्या या ट्वीटला विराटने उत्तर देत म्हटले, ‘धन्यवाद, अशीच चमकदार कामगिरी करत राहा आणि पुढे जात राहा. ऑल द बेस्ट.’
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
विराटने ४६३ आंतरराष्ट्रीय सामन्यात २३७२६ धावा केल्या आहेत. यामध्ये ७० शतके आणि १२२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय शतक केले होते. मागील दोन वर्षांपासून त्याने मोठी धावसंख्या उभारली नाही. तसेच तो सतत धावा करण्यात अपयशी ठरत असल्याने त्याच्यावर चोहोबाजूंकडून टिका होत आहेत. अशातच त्याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातूनही वगळले असल्याने विराटची मोठी सामनाविजयी खेळी कधी पाहायला मिळणार याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर त्याचे ७१वे शतक कधी होणार याचे चाहते चातकासारखी वाट पाहत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी जिम्बाब्वे करणारा ऑस्ट्रेलिया दौरा, क्वालिफायर सामन्यात नेदरलँड पराभूत
रिषभ पंत अन् इंग्लंडचा अंत! वनडेतील पहिलेच शतक झळकावत परदेशी भुमीवर केलीये ‘ही’ रेकॉर्डब्रेक कामगिरी