भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याचे चाहते जगातील प्रत्येक कोपऱ्यात आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये विराटची लोकप्रियता झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. जगभरातील चाहत्यांसोबतच नामांकीत व्यक्ती आणि खेळाडूही विराटला प्रेरणास्थान मानतात. सर्बियाचा स्टारक टेनिसपटू आणि विराट कोहली यांच्यांतील संबंधाविषयी मागच्या मोठ्या काळापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता राहिली आहे. आता जोकोविचने स्वतः विराट कोहलीसोबत त्याचे संबंध कसे आहेत, याचे उत्तर दिले.
सध्या वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलिया ओपण सुरू आहे. जोकोविच टेनिसमधील सर्वात यशस्वी खेळाडू राहिला आहे. त्याने आतापर्यंत विक्रमी 24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) याच्याप्रमाणेच जोकोविच हादेखील जगभारत लोकप्रिय आहे. असे असले तरी, विराट आणि जोकोविच हे दिग्गज खेळाडू चाहत्यांना एकत्र कधीच दिसले नाहीत. याबाबतच जोकोविचने नुकतीच प्रतिक्रिया दिली.
ऑस्ट्रेलिया ओपन (Australia Open) स्पर्धा सुरू असताना सोनी स्पोर्ट्सवर जोकोविचला विराट कोहली (Virat Kohli) याच्याबाबत प्रश्न विचारला गेला. यावर नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) म्हणाला की, “विराट कोहली आणि मी मागच्या काही वर्षांपासून मेसेजवर बोलत आहोत. अजपर्यंत एकमेकांना भेटण्याची संधी मिळाली नाी. पण मी त्याचे खूप कौतुक करतो. त्याच्याशी बोलनणे आणि ऐकणे ही सन्मानाची आणि विशेष बाब आहे.”
Novak Djokovic said “Virat Kohli and I have been texting a little bit for a few years, we haven’t got an opportunity to meet each other but I admire him a lot – it’s honour & privilege to speak & listen to him”. [Sony Sports] pic.twitter.com/9xEofq9iI1
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2024
दरम्यान, नोवाक जोकोविच नेहमीप्रमाणे यावर्षीची सुरुवात ग्रँडस्लॅम जिंकून करू इच्छित आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे बोलोल जात होते. युनाईटेड कपमध्ये सर्बियाकडून खेलताना त्याला ही दुखापत झाली होती. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याच्यावर दोन वेळा उपचाराची गरज भासली होती. परिणामी तो ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स डि मिनॉर याच्याकडून पराभूत झाला होता. जोकोविचने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार आता तो दुखापतीतून सावरला आहे. दरम्यानच्या काळात त्याला विश्रांती आणि दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ मिळाला होता.
दुसरीकडे भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहील तब्बल 14 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विराटला संघात निवडले गेले आहे. असे असले तरी, मालिकेतील पहिल्या सामन्यातून त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली खेळताना दिसू शकतो. याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये विराट कोहलीने आपला शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. टी-20 विश्वचषकाचा हा उपांत्य सामना असून भारताला इंग्लंडकडून दारून पराभव स्वीकारावा लागाल होता. त्यानंतर विराट आणि रोहित शर्मा यांनी टी-20 क्रिकेटमधून मोठी विश्रांती घेतली. (Novak Djokovic talks to Virat Kohli on messages)
महत्वाच्या बातम्या –
Bhuvneshwar Kumar । 8 विकेट्स घेत गाजवलं ग्रीन पार्क, भुवनेश्वरने पुन्हा ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे
Bangladesh Cricket । नजमूल हसन यांचा मोठा निर्णय! सोडणार बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद