वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या यूएस ओपनमध्ये सोमवारी (11 सप्टेंबर) उशिरा पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळला गेला. सार्बियाचा नोवाक जोकोविच व रशियाचा डॅनियल मेदवेदेव हे या अंतिम सामन्यात समोरासमोर आलेले. यामध्ये अनुभवी जोकोविच याने मेदवेदेव याला 6-3, 7-6, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत विश्वविक्रमी 24 वे ग्रॅंडस्लॅम जिंकले.
उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित अल्कारेझ याचे आव्हान संपुष्टात आणलेल्या मेदवेदेव याच्याकडून जोकोविला चांगली लढत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, जोकोविचने त्याच्यावर एकतर्फी वर्चस्व गाजवले. दुसरा सेट वगळता तो फारसा प्रतिकार करू शकला नाही. याच कारणाने जोकोविच आपले 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्यात यशस्वी ठरला. विशेष म्हणजे 2021 यूएस ओपन अंतिम सामन्यात मेदवेदेवने जोकोविचला पराभूत केलेले.
जोकोविचने आतापर्यंत दहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, सात वेळा विम्बल्डन, चार वेळा यूएस ओपन व तीनदा फ्रेंच ओपन आपल्या नावे केले आहे. तसेच तो ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू देखील बनला.
(Novak Djokovic Won US Open Beat Medvedev Its 24 Grandslam For Him)
महत्वाच्या बातम्या –
“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ
पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक संघांची विजयी सलामी