सध्या भारत-न्यूझीलंड संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. तत्पूर्वी ‘मोहम्मद शमी’च्या (Mohammed Shami) पुनरागमनाची भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शमी भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या शमीने आपल्या फिटनेसबाबत माहिती देताना सांगितले की, तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) खेळण्यासाठी तयार आहे.
रेवस्पोर्ट्स ग्लोबलच्या रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमी म्हणाला, “मी आता वेदनांपासून मुक्त झालो आहे. काल बेंगळुरूमध्ये पूर्ण तीव्रतेच्या गोलंदाजी सत्रात मला खूप चांगले वाटले. मला पुरेशी गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला जायचे लक्ष्य आहे. त्यासाठी रणजी ट्राॅफीतील 1 किंवा 2 सामन्यांसाठी निश्चित केले आहे.”
मोहम्मद शमीने (Mohammed Shami) गेल्या 1 वर्षापासून एकही सामना खेळला नाही. (19 नोव्हेंबर 2023) रोजी त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला, जो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा फायनल सामना होता. तेव्हापासून शमी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. शमीने भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळले आहेत. त्याने आतापर्यंत 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 229, एकदिवसीय सामन्यात 195 आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा रचणार इतिहास? या दिग्गजाला टाकणार मागे
खराब फॉर्मशी झगडत असलेल्या बाबर आझमला सेहवागचा सल्ला, कमबॅक करण्याचं सूत्र सांगितलं
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू, निवृत्तीनंतरही ‘हा’ भारतीय दिग्गज शीर्ष स्थानी