---Advertisement---

VIDEO: मैदानावर अचानक घुसला कुत्रा, खेळाडूंची उडाली धांदल, पाहा पुढे काय घडलं

On: शनिवार, जुलै 5, 2025 10:22 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे ते यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. या मालिकेतील दुसरा सामना दोन्ही संघांमध्ये ग्रेनेडा येथील मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे.

दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघ पहिल्या डावात 253 धावा करून बाद झाला, तर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 गडी गमावून केवळ 12 धावा केल्या त्यांना एकूण 45 धावांची आघाडी मिळाली आहे.

दुसऱ्या दिवशी जेव्हा वेस्ट इंडिज संघ पहिल्या डावात फलंदाजी करत होता, तेव्हा 32.2 षटकांनंतर अचानक एक कुत्रा मैदानात शिरला. हे दृश्य पाहून सर्व खेळाडू क्षणभर आश्चर्यचकित झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पैट कमिन्सने पुढाकार घेत कुत्र्याला बाउंड्री लाइनबाहेर हाकलून लावले. या घटनेमुळे काही वेळ खेळ थांबवावा लागला. अशा विचित्र घटनांमुळे खेळात मजा तर येतेच, पण खेळ थोडा वेळ विस्कळीतही होतो.

याआधी श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील वनडे सामन्यातही अशाच प्रकारे एक साप मैदानावर आल्याने खेळ थांबवावा लागला होता.

ग्रेनेडा कसोटी सामना सध्या अत्यंत रोचक वळणावर पोहोचला आहे. दोन दिवसांत एकूण 12 बळी गेले असून गोलंदाजांनी आपला प्रभाव दाखवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फक्त 12 धावांत दोन्ही सलामीवीर माघारी परतले. सॅम काॅन्टास
खातेही उघडू शकला नाही, तर उस्मान ख्वाजा केवळ 2 धावा करून बाद झाला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत कॅमेरून ग्रीन 6 धावांवर खेळत आहे, तर नाईटवॉचमन म्हणून आलेला नॅथन लायन 2 धावांवर नाबाद होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---