---Advertisement---

IND vs ENG: ‘आता त्याची वेळ संपली’ मायकल वॉनने ‘या’ भारतीय फलंदाजाबद्दल केली मोठी भविष्यवाणी

On: सोमवार, जुलै 14, 2025 7:04 PM
---Advertisement---

इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) हे नेहमी थेट बोलण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी भारतीय संघात जवळपास आठ वर्षांनंतर परतलेल्या करुण नायरबद्दल (Karun Nair) मोठं भाकीत केलं आहे. वॉन म्हणाले की, जर टीम इंडियाचा लॉर्ड्स कसोटी सामन्यात पराभव झाला, तर करुण नायरला भारतीय संघातून बाहेर करण्यात येऊ शकते.

या गोष्टीमध्ये कोणतीच शंका नाही की, करुण नायरला खूप मोठ्या अपेक्षांसहित संघात घेण्यात आले होतं, पण त्याने खेळलेल्या तिन्ही कसोटी सामन्यांत निराशा केली. विशेष म्हणजे बहुतेक वेळा नायर सुरुवातीचा कठीण काळ खेळल्यानंतर बाद झाला.

वॉन म्हणाले, मला वाटतं, जर भारत लॉर्ड्समध्ये हरला, तर नायरचा काळ संपेल. तिसरा कसोटी सामना हरल्यास भारतीय संघ व्यवस्थापनाला सखोल पुनरावलोकन करावं लागेल. पंडित आणि मीडिया जे काही बोलतील त्यापेक्षा संघ स्वतःच आपली चूक तपासेल.

वॉननी दुसऱ्या डावात नायर ज्या पद्धतीने बाद झाला, त्याला ब्रेन फेड म्हणजे मनाने काम करणे थांबवलं आहे असं म्हटलं.
माजी कर्णधार म्हणाले, नायर सरळ येणारा चेंडू सोडण्याचा प्रयत्न करत होता. ही अगदी ब्रेन फेडसारखी स्थिती होती. माझ्या मते नायरच्या विकेटमुळे सामना पुन्हा उघड झाला.

त्याचवेळी, माजी विकेटकीपर दिनेश कार्तिक (Dinesh karthik) म्हणाला, असं वाटतं की आकाश दीप (Aakash Deep) नाइट वॉचमन म्हणून खेळायला तयार नव्हता. पण अल्प वेळात नायर आणि गिल बाद झाल्यामुळे त्याला ही भूमिका घ्यावी लागली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---