IND vs ENG 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला हैद्राबादमध्ये सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजाने शानदार कामगिरी केली. त्याला आर अश्विन आणि अक्षर पटेल यांची चांगली साथ मिळाली. प्रथम फलंदाजी घेतलेल्या इंग्लंडला मात्र नाणेफेक जिंकूनही विशेष कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे जडेजाने मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५० विकेट घेणारा जडेजा जगातील ३०वा तर भारताचा ७वा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. जडेजाने आतापर्यंत ६९ कसोटी, १९७ वनडे आणि ६६ टी२० सामने खेळले आहे. यात त्याने २९च्या सरासरीने हा पराक्रम केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुरलीधरनने १३४७ विकेट्स घेतल्या आहेत तर शेन वॉर्नच्या नावावर १००१ विकेट्स आहेत. भारताकडून अनिल कुंबळे यांनी ९५६ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तर दुसऱ्या स्थानावार जडेजाचाच संघसहकारी असलेला आर अश्विन आहे. त्यात भारताकडून ७२० विकेट्स घेतल्या आहेत.
गेली 15 वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या 35 वर्षीय रविंद्र जडेजासाठी ही मोठी उपलब्धी आहे. आता त्याला भारताचा महान गोलंदाज जवागल श्रीनाथचा विक्रम खुणावत आहे. श्रीनाथने 296 सामन्यात 551 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
956 – अनिल कुंबळे, सामने- 401
720 – आर अश्विन, सामने- 277
711 – हरभजन सिंग, सामने- 365
687 – कपिल देव, सामने- 356
610 – झहिर खान, सामने- 303
551 – जवागल श्रीनाथ, सामने- 296
551- रविंद्र जडेजा, सामने- 332
हेही वाचा
कहर झाला! रन काढले 6, दिले 5, IND-ENG कसोटीत घडली अजब घटना
नाद खुळा! जगातील सर्वोत्तम क्रिकेटर रुटला २ भारतीयांनी केलंय नको-नको






