तब्बल 30 वर्षानंतर पाकिस्तान कडे आयसीसी स्पर्धेचे यजमानपद आले आहे. या पूर्वी वर्ल्ड कप 1996 चे यजमानपद सांभाळले होते. याबद्दल पाकिस्तानचे माजी खेळाडू रमिझ राजा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना हे समजायला तब्बल 29 वर्ष लागले की, पाकिस्तान हे एक सुरक्षित आणि मोठ्या इव्हेंट साठी नेहमीच तयार असलेला देश आहे. असो, पण जगाला आपला पक्ष समजला ते महत्वाचे. असे रमिझ राजा यांनी ठळक वक्तव्य केले आहे.
रमिझ राजा यांनी सांगितले की, पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद 4 वर्षांपूर्वी 2021 मध्ये मिळाले होते.रमिझ राजा तेव्हा क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी चे यजमानपद पाकिस्तानला भेटले ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यासोबतच आपण आपला संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात यशस्वी होऊ. सोबतच रमिझ राजा म्हणले की, चॅम्पियन्स ट्रॉफी चे यजमानपद तरुणांसाठी व संस्कृतीला पुढे घेऊन ज्याण्यासाठी आणि जागतिक पातळीवर पाकिस्तान बद्दलचे विचार बदलण्यासाठी ची एक सुवर्ण संधी आहे.
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतु , भारतीय संघाचे सामने पाकिस्तान मध्ये न होता दुबई मध्ये खेळले जाणार आहेत. याशिवाय दुबई मध्ये पहिला सेमीफायनल सामना खेळला जाईल. या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना (5 मार्च) रोजी खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
क्रिकेट चाहत्यांसाठी गिफ्ट! चॅम्पियन्स ट्रॉफीची सर्व माहिती आणि वेळापत्रक एका क्लिकवर!
“रोहित शर्माच्या विनोदबुद्धीचा मास्टरस्ट्रोक, जडेजाच्या प्रश्नावर दिले हटके उत्तर!”
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार अटीतटीचा, पण कोण बाजी मारणार?






