इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे (आयपीएल २०२२) बिगूल वाजले असून हा हंगाम केवळ २ आठवड्यांवर आला आहे. २६ मार्चपासून आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) ताफ्यातून मोठी बातमी पुढे येत आहे. शनिवार रोजी (१२ मार्च) बेंगलोरने त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा (RCB New Captain) केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) याची बेंगलोरच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे.
डू प्लेसिस बेंगलोर संघाचे नेतृत्त्व करणारा चौथा परदेशी आणि एकंदर सातवा कर्णधार बनला आहे. त्याच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, इंग्लंडचा केविन पीटरसन आणि न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी यांनी बेंगलोर संघाचे नेतृत्त्व सांभाळले आहे.
यासह बेंगलोरचा संघ आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक परदेशी कर्णधार असलेला (Number of overseas captain for each IPL team) चौथा संघ बनला आहे. आतापर्यंत पंजाब किंग्जने सर्वाधिक ७ परदेशी खेळाडूंना त्यांच्या कर्णधारपदी नियुक्त केले आहे. तर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ५ परदेशी कर्णधारांना आजमावले आहे. दुसरीकडे बेंगलोरप्रमाणेच मुंबई इंडियन्सलाही ४ परदेशी कर्णधार लाभले आहेत. तर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांच्या नेतृत्त्वपदी अनुक्रमे ३ आणि २ परदेशी खेळाडूंची वर्णी लागली आहे.
हेही वाचा- RCB New Captain | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा नवा कर्णधार, ‘या’ दिग्गजाच्या नेतृत्त्वाखाली खेळणार विराट
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज हा असा एकमेव संघ आहे, ज्यांनी आतापर्यंत एकाही परदेशी खेळाडूला त्यांचा संघनायक बनवलेले नाही. चेन्नई संघाचे आतापर्यंत केवळ २ कर्णधार होऊन गेले आहेत, एक म्हणजे एमएस धोनी आणि दुसरा सुरेश रैना.
फाफ डू प्लेसिस बेंगलोरचा सातवा कर्णधार
दरम्यान डू प्लेसिस आता २७ मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, मुंबईच्या मैदानातून बेंगलोरच्या नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळेल. तो बेंगलोर संघाचे नेतृत्त्व करणारा सातवा कर्णधार असेल. त्याच्यापूर्वी विराट कोहली, शेन वॉटसन, डॅनियल व्हिटोरी, अनिल कुंबळे, केविन पीटरसन आणि राहुल द्रविड यांनी बेंगलोर संघाचे नेतृत्त्व केले आहे. यातील विराटने सर्वाधिक तब्बल १० हंगाम (२०११ ते २०२१) बेंगलोर संघाचे नेतृत्त्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
RCB New Captain | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा नवा कर्णधार, ‘या’ दिग्गजाच्या नेतृत्त्वाखाली खेळणार विराट
अश्विनने कपिल देव यांचा तर विक्रम मोडलाच, आता डेल स्टेनच्या ‘या’ विक्रमावरही आहे नजर
‘बडे दिलवाली’ स्म्रीती, स्वत: सामनावीर पुरस्काराची दावेदार असूनही हरमनप्रीतसोबत शेअर केला अवॉर्ड