---Advertisement---

डॉक्टरांच्या चुकीने खेळाडूची कारकीर्द लागली पणाला! चुकवली महत्त्वाची शस्त्रक्रिया?

On: सोमवार, जानेवारी 2, 2023 4:53 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या खेळात अनेकदा मोठ्या दुखापतीनंतर खेळाडूंवर शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर काही दिवसांनी ते खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होतात. मात्र, बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज नुरुल हसनसोबत काही वेगळीच घटना घडली आहे. दुखापतीनंतर करण्यात आलेली शस्त्रक्रिया त्याला चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी झिम्बाब्वे दौऱ्यात नुरुल हसनला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली. मात्र शस्त्रक्रियेनंतर दुखापत बरी होण्याऐवजी ती दुखापत त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली. नुरुल याने एका मुलाखतीत सांगितले की, कदाचित त्यांची शस्त्रक्रिया योग्य प्रकारे झाली नसून, त्याच्या बोटात अजूनही वेदना आहेत.

नुरूल याने नुकतीच एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत दिली. यामध्ये त्याने आपल्या कारकिर्दीविषयी चिंता व्यक्त केली. तो म्हणाला,

“सध्या मी वेदनेशी झगडत आहे. मला अशी शंका आहे की माझी शस्त्रक्रिया चुकीची झाली होती. कारण त्यानंतर मला जास्त त्रास होताना दिसतो. मी शस्त्रक्रिया केली नसती तर कदाचित मला हा त्रास झाला नसता.”

नुरूल हा टी20 विश्वचषकात व भारताच्या मालिकांमध्ये इंजेक्शन घेऊन खेळला होता. त्याने स्वतः याबाबत खुलासा केला. इंजेक्शन घेतल्यानंतर आपले बोट सुन्न पडत असल्याचे त्याने म्हटले. नुरूलने सिंगापूर येथे आपल्या बोटावर शस्त्रक्रिया केलेली. डॉक्टर ऍन्थनी फू यांनी राफेल हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया केली होती. नुरूल हा सध्या बांगलादेश संघाचा प्रमुख सदस्य आहे. मात्र, भारताविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याला तितकी प्रभावी कामगिरी करता आली नव्हती.

(Nurul Hasan Operation Not Sucess He Is Paining)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकीचा वर्ल्डकप येतोय! जाणून घ्या भारताचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
बीसीसीआयच्या निर्णयावर आयपीएल फ्रॅंचायजींचे प्रत्युत्तर! म्हणाले, ‘ते असे नाही म्हणू…’

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---