पुणे : महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. दिनांक २२ ते २५ डिसेंबर दरम्यान स्पर्धा होणार आहे. गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल माॅल मधील फुटबाॅल ग्राऊंडवर ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून खेळाडू फुटबाॅल लीग मध्ये सहभागी होणार आहेत.
सुप्रसिद्ध सनदी लेखापाल ललित पोफलीया व उद्योजक संजय बिहाणी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून खेळाडू सहभाग घेत आहेत. यंदा स्पर्धेमध्ये एकूण ३४ संघांचा समावेश असून २४० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्धाटन २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. मुंबई, सांगली, नागपूर, अमरावती यांसह महाराष्ट्रातील विविध भागातून स्पर्धक सहभागी होणार आहेत.
साखळी पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक वयोगटात विजेता आणि उपविजेत्या ट्राॅफीज देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. न्याती ग्रुप हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत तर पूर्णार्थ अॅडव्हायझर हे सहप्रायोजक आहेत. १८ वर्षापुढील पुरुष गट, ११ ते १८ वर्षामधील मुले, ७ ते ११ वर्षांमधील मुले, १० ते १६ आणि १६ वर्षांपुढील मुली या वयोगटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. (Nyati Maheshwari Football League from today, organized by Mahesh Seva Sangh Yuva Samiti: 7th year of competition)
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA । स्लो खेळपट्टीवर सॅमसन, तिलक आणि रिंकूचा धमाका, विजयासाठी दक्षिण आफ्रिकेपुढे 297 धावांचे लक्ष्य
एमजे चषक । जीएसटी,पीसीएमसी अकादमी उपांत्य फेरीत; मध्य रेल्वे व क्रीडा प्रबोधिनी यांचीही आगेकूच