न्यूझीलंड येथे तिरंगी मालिका सुरू आहे. यातील तिसरा सामना रविवारी (9 ऑक्टोबर)न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZvBAN) यांच्यात खेळला गेला. ख्राईस्टचर्चच्या हेगले ओवलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या टी20 सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकीपटूने इतिहास रचला आहे. बांगलादेश विरुद्ध इश सोधी याने 4 षटकात 31 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये दोन पराक्रम आपल्या नावावर केले आहेत.
इश सोढी (Ish Sodhi) हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पाचवा आणि न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू ठरला आहे. तसेच तो वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्याआधीच क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन (Shakeeb Al Hasan) हा पहिल्या स्थानावर आहे. त्याने 122 विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तानचा राशिद खान 118 विकेट्सह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा टीम साऊदी 117 आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा 107 विकेट्स घेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
सोधी आणि साऊदीसोबतच न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सोफी डिवाईन हीने पण आंतरराष्ट्रीय टी20मध्ये100 विकेट्सचा टप्पा गाठला आहे.
सोधीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द पाहिली तर त्याने 17 कसोटी आणि 37 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे 41 आणि 48 विकेट्स घेतल्या आहेत. 29 वर्षाच्या या खेळाडूने 78 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येच 100 विकेट्सचा आकडा पार केला आहे.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेश संघाने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने नाबाद 70 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने 17.5 षटकात 2 विकेट्स गमावत हे लक्ष्य पार केले आहे. न्यूझीलंडचा हा या तिरंगी मालिकेतील पहिलाच विजय आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स (पुरूष)
122* शाकीब अल हसन
118* राशिद खान
117* टीम साऊदी
107 लसिथ मलिंगा
101* इश सोधी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! 22 ग्रँडस्लॅम विजेता राफा नदाल बनला बापमाणूस, पत्नी मारियाने मुलाला दिला जन्म
टी20 क्रिकेटमधील ‘न भूतो’ कामगिरी शाकिबच्या नावे; इतिहासात आजवर कोणीच पोहोचले नाही जवळपास