---Advertisement---

‘या’ प्रलोभनाने संघाला शेवटच्या सत्रात खेळ उंचवण्यासाठी दिले प्रोत्साहन, केन विलियम्सनने केला उलगडा

On: बुधवार, डिसेंबर 30, 2020 9:49 PM
---Advertisement---

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा 101 धावांनी मात केली. त्यानंतर न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन म्हणाला की विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणे म्हणजे खूप मोठे प्रलोभन आहे. ज्यासाठी संघ आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी प्रेरित होतात.

या सामन्यात पाकिस्तान संघाने सामना अनिर्णीत ठेवण्यासाठी खूप संघर्ष केला. परंतु 31 धावांत 6 गडी गमावल्याने त्यांना 101 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या विजयामुळे न्यूझीलंड संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर पोहचला आहे. या यादीतील पहिले दोन संघ या स्पर्धेतील अंतिम सामना खेळतील.

सामन्यानंतर केन विलियम्सन म्हणाला, “निश्चितपणे आम्हाला विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम सामना खेळायचा आहे. आज आम्ही शेवटच्या सत्रात याला व्यवस्थित समजून घेतले. जेव्हा हे ध्येय आमच्या डोक्यात होते.”

केन विलियम्सन म्हणाला, “परंतु कसोटी सामन्यात तुम्हाला माहित असते की, आपल्या प्रत्येक सत्रात पुढे जायचे असते आणि आपल्याला अशा प्रकारे खेळायचे असते. आम्ही आमचा डाव घोषित केला आणि जर विकेट खराब नसती तर अशात त्यांच्याकडे संधी असती. त्याच्याकडे खेळपट्टीवर सकारात्मक विचाराने आणि दृष्टीने खेळणारे खेळाडू होते, आणि काहींना अजून खेळायचे होते. तुम्ही स्वतःला सामना जिंकण्यासाठी संधी देता परंतु तुम्ही पराभूत सुद्धा होवू शकता. अंतिम सत्रात तीन परिणामातून काहीही निघू शकत होते. ”

या सामन्यात तत्पूर्वी न्यूझीलंड संघाने आपल्या पहिल्या डावात 155 षटकांत सर्वबाद 431 धावा केल्या होत्या. त्यांनंतर पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 102 षटकात सर्वबाद 239 धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंड संघाने 5 गडी गमावून 180 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला होता .पाकिस्तान संघाने दुसर्‍या डावात 123.3 षटकांत सर्वबाद 271 धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग: भीषण अपघातातून बालंबाल बचावले मोहम्मद अझरुद्दीन, गाडीचा झाला चक्काचूर
– थोडेथोडके नाही, तर तब्बल ११ वर्ष ५ महिन्यांनंतर या क्रिकेटरने केलंय दुसरं कसोटी शतक
– सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत श्रीसंतचा सहभाग निश्चित, खास कॅप्शन देत शेअर केला व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---