Bangladesh Win By 5 Wickets: बांगलादेश संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश संघात 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. यातील वनडे मालिका न्यूझीलंडने 2-1ने नावावर केली आहे. त्यानंतर टी20 मालिकेला बुधवारपासून (दि. 27 डिसेंबर) सुरुवात झाली. पहिला सामना नेपियरच्या मॅकलीन पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने 5 विकेट्सने विजय मिळवत इतिहास घडवला. टी20 क्रिकेटमध्ये हा बांगलादेशचा न्यूझीलंडमध्ये पहिला विजय ठरला. या विजयासह बांगलादेशने मालिकेत 1-0ने आघाडीही घेतली.
या सामन्यात बांगलादेश (Bangladesh) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 134 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने 18.4 षटकात 5 विकेट्स गमावत 137 धावा केल्या आणि सामना 5 विकेट्सने जिंकला. या सामन्याचा शिल्पकार महेदी हसन ठरला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
What a performance by Bangladesh 👏
They have taken a 1-0 lead in the three-match T20I series.#NZvBAN | 📝: https://t.co/AYk3ZsriBQ pic.twitter.com/KjfiVrnagW
— ICC (@ICC) December 27, 2023
यावेळी बांगलादेशकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक आणि सलामीवीर फलंदाज लिटन दास (Litton Das) याने 36 चेंडूत नाबाद 42 धावांची विजयी खेळी केली. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 2 चौकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त सौम्य सरकारने 22, कर्णधार नजमुल होसेन शांतो (Najmul Hossain Shanto), तौहीद हृदोय आणि महेदी हसन यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. हसन यावेळी नाबाद राहिला. सलामीवीर रोनी तालुकदारने 10 धावांचे योगदान दिले. अफीफ होसेनला 1 धावेवर तंबूत परतावे लागले.
न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना पाच गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्यात कर्णधार मिचेल सँटनर (Mitchell Santner) याच्यासोबत टीम साऊदी, ऍडम मिल्ने, जेम्स नीशम आणि बेन सियर्स यांचा समावेश होता.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून जिमी नीशम याने 29 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 48 धावांचे योगदान दिले. तसेच, फक्त मिचेल सँटनर 23 धावांचे योगदान देऊ शकला. त्यांच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज 20 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. दोन फलंदाज शून्यावर बाद झाले. डॅरिल मिचेल फक्त 13 धावा करू शकला.
बांगलादेशकडून गोलंदाजी करताना शोरिफुल इस्लाम चमकला. त्याने 4 षटकात 26 धावा खर्चत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त महेदी हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, तंजीम हसन साकिब आणि रिशाद होसेन यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली. (nz vs ban 1st t20i bangladesh beat new zealand by 5 wickets and make history)
हेही वाचा-
धावा करूनही राहुलवर प्रश्न उपस्थितीत होतात! माजी दिग्गजाचे विधान चर्चेत, वाचा सविस्तर
Boxing Day Test । राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताची 245 धावांपर्यंत मजल, आता गोलंदाजांची कसोटी