हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना 31 जानेवारीपासून हॅमिल्टन येथे सुरु होत आहे. भारतीय संघ या मालिकेत 3-0 असा विजयी आघाडीवर आहे.
हा सामना भारतीय कर्णधार रोहित शर्माचा 200वा वन-डे सामना असणार आहे. यामुळे तो वन-डे क्रिकेटमध्ये 200 सामन्यांचा टप्पा गाठणारा 14वा भारतीय तर जगातील 80वा खेळाडू ठरणार आहे.
यावेळी रोहितला यष्टीरक्षक एमएस धोनीचा एक खास विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याने जर उद्याच्या सामन्यात एक जरी षटकार मारला तर तो भारताकडून वन-डेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये एकटाच अव्वल क्रमांकावर येईल.
त्यातच या सामन्यात धोनीनेही रोहित एवढेच षटकार मारले तर पुन्हा एकदा दोघे भारताकडून वन-डेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर राहतील.
रोहितचे भारताकडून खेळताना वनडेमध्ये 215 षटकार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे तो भारताकडून वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत धोनीसह अव्वल क्रमांकावर आला आहे. धोनीनेही भारताकडून वनडेत 215 षटकार मारले आहेत.
धोनीने भारताकडून 334 वनडे सामने खेळताना 215 षटकार मारले आहेत. तर रोहितने 199 सामन्यात 215 षटकार मारले आहेत.
त्याचबरोबर धोनीने कारकिर्दीत 3 वनडे सामने आशिया संघाकडून खेळले असल्याने त्याने या तीन सामन्यात 7 षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याचे वनडेत एकूण षटकार 222 आहेत. पण भारताकडून त्याने 215 षटकारच मारले आहेत.
भारताकडून वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
215 – रोहित शर्मा
215 – एमएस धोनी
195 – सचिन तेंडुलकर
189 – सौरव गांगुली
153 – युवराज सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
–चौथ्या वनडेसाठी टीम इंडियात होऊ शकतात हे २ मोठे बदल
–रोहित करणार असा काही कारनामा की धोनी- विराट पाहातच रहातील
–५२ वर्षांत जे घडले नाही ते रोहित सेनेला न्यूझीलंडमध्ये करण्याची संधी