वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 35 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे.
या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अंबाती रायडू ठरला तर मालिकावीराचा पुरस्कार मोहम्मद शमीने पटकावला आहे. त्याने या आजच्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या असून मालिकेतील 4 सामन्यांमध्ये खेळताना 15.33च्या सरासरीने एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत.
वनडे मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा शमी भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज (अष्टपैलू खेळाडू व्यतिरिक्त) ठरला आहे. त्याच्याआधी भुवनेश्वर कुमारने 2013मध्ये विंडीज-श्रीलंका-भारत या तिंरगी मालिकेत 9.70च्या सरासरीने 10 विकेट्स घेत मालिकावीर ठरला होता.
2017मध्ये श्रीलंकेविरुद्ध जसप्रीत बुमराहने 11.26च्या सरासरीने 15 विकेट्स घेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.
आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 252 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 44.1 षटकात सर्वबाद 217 धावाच करता आल्या. भारताकडून युजवेंद्र चहलने 3, हार्दिक पंड्या, शमीने प्रत्येकी 2 आणि भुवनेश्वर कुमारने 1 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–कोहली-रोहितच्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच केला असा पराक्रम
–एमएस धोनीसाठी न्यूझीलंड विरुद्धचा पाचवा वनडे या कारणामुळे ठरला खास
–रायडू-विजय जोडी चमकली, संघाला संकटातून बाहेर काढताना केला हा मोठा पराक्रम